Rinku Singh | Yash Dayal Sakal
IPL

Yash Dayal: रिंकू सिंगच्या त्या 5 सिक्सनंतर काय झालेलं? स्वत: गोलंदाजाचा खुलासा, 'मला सांगण्यात आलेलं...'

Yash Dayal: आयपीएलमध्ये रिंकू सिंगने सलग 5 षटकार ठोकल्यानंतर काय अवस्था झाली होती, याबद्दल यश दयालने माहिती दिली आहे.

Pranali Kodre

Yash Dayal News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने आत्तापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात बेंगळुरूने वेगवान गोलंदाज यश दयालला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती.

दरम्यान, दयाल गेल्यावर्षी गुजरात टायटन्सकडून खेळला होता, पण गुजरातने त्याला आयपीएल 2024 पूर्वी करारमुक्त केले. त्यानंतर बेंगळुरूने दयालला लिलावात 5 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

दरम्यान दयाल गेल्यावर्षी एका घटनेमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. आयपीएल 2023 मध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या दयालविरुद्ध रिंकू सिंगने सलग 5 षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दयालला कोणता त्रास सहन करावा लागला, याबद्दल जवळपास एक वर्षाने त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

आयपीएल 2024 मधील बेंगळुरूच्या दुसऱ्या सामन्यानंतर मोहम्मद सिराजशी बोलताना दयालने त्या घटनेबद्दल भाष्य केले.

त्याने सांगितले, 'सामन्यानंतर मी परत गेलो, मला खूप वाईट वाटत होतं. तेव्हा मला सांगितलं होतं की सोशल मीडिया पाहू नकोस, पण तरी मी पाहिले. लोक काय विचार करतात, हे पाहून खूप वाईट वाटलं, मी कोणत्या पार्श्वभूमीतून आलोय आणि खेळत आहे, हे पण पाहिले पाहिजे. दोन-तीन दिवसातच माझी तब्येत बिघडली.'

यानंतर सिराजने त्याला त्याने त्यातून पुनरागमन कसे केले असे विचारल्यानंतर दयाल म्हणाला, 'डोक्यात माझ्या सुरू होतं की मी अशा परिस्थितीत अडकलेला पहिला व्यक्ती नाही, त्यामुळे मी बाहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढच्या वाटचालीसाठी प्रयत्न सुरू केले.'

मुरली कार्तिकचं वादग्रस्त व्यक्तव्य

दरम्यान, सोमवारी (26 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघातील सामन्यादरम्यान मुरली कार्तिकने एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या सामन्यात बेंगळुरूने वेगवान गोलंदाज यश दयाललाही संधी दिली होती.

त्यावरून कार्तिकने दयालचे नाव न घेता 'कोणासाठीचा तरी कचरा, कोणासाठी तरी खजिना ठरू शकतो,' असे व्यक्तव्य केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सने कार्तिकवर टीका केली होती. (Yash Dayal's answer to Murali Kartik's statement)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT