Yash Dhull Statement About IPL 2022 Auction
Yash Dhull Statement About IPL 2022 Auction esakal
IPL

U19 विजेतेपदाने हुरळून गेलो नाही; IPL बाबत यश धुलचे मोठे वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

भारताने इतिहासात जेव्हा जेव्हा U19 वर्ल्डकप (U19 World Cup 2022) जिंकाला आहे त्या संघातून वरिष्ठ संघाला खेळाडूंची चांगली रसद मिळाली आहे. युवराज सिंग, मोहम्मद कैफ, विराट कोहली, रविंद्र जडेजा, मनिष पांडे, वेणुगोपाल राव, शुभमन गिल, पृथ्वी शॉ असे बरेच खेळाडू भारतीय वरिष्ठ संघात चमकले. आता यंदाच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार यश धुल (Yash Dhull) याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असणार आहेत. त्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत या सर्व गोष्टींबद्दल आपले मत व्यक्त केले. (Yash Dhull Statement About IPL 2022 Auction)

यश या मुलाखतीत म्हणाला की, 'U19 वर्ल्डकप नुकताच संपला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया खूप मोठी आहे. U19 वर्ल्डकप (U19 World Cup) ही फक्त पहिली पायरी आहे. मला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. मी या यशाने हुरळून जाणार नाही. मला माझे ध्येय गाठण्यासाठी खूप कष्ट करायचे आहेत. नक्कीच मला भारताच्या वरिष्ठ संघाकडून खेळायला आवडेल. मात्र मी त्या संधीची वाट पाहणार आहे.'

तो पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी माझे 100 टक्के योगदान देईन. ज्या प्रकारे विराट कोहली (Virat Kohli) भारताकडून खेळतो त्या प्रकारे माला देखील खेळायला आवडेल. मला माझ्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करायचे आहे.' विशेष म्हणजे धुलला आयसीसीच्या U19 संघाचाही कर्णधार करण्यात आले आहे.

IPL बाबत यश धुल काय म्हणाला?

यश धुलने यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Mega Auction) सहभागी होणार आहे. तो 590 खेळाडूंच्या शॉर्टलिस्टमध्येही आहे. वर्ल्डकपमध्ये ज्या प्रकारे यश धुलने फलंदाजी केली ते पाहता त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी बोली लागणार हे नक्की. धुल हा अनकॅप खेळाडू असल्याने त्याची बेस प्राईस 20 लाख रूपये आहे.

मात्र यश धुलने (Yash Dhull IPL Auction) आयपीएलबाबत एक मोठे विधान केले. त्याच्या या विधानामुळे वर्ल्डकप जिंकल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर असल्याचे दिसून येते. तो म्हणाला की, 'मी सध्या आयपीएल लिलावाबाबत विचार करत नाही. नक्कीच आयपीएल हे मोठे व्यसपीठ आहे. इथे खेळाडू आपला खेळ एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाऊ शकतो. मी कोणत्याही संघाकडून खेळण्यास तयार आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT