Yashasvi Jaiswal IPL Record esakal
IPL

Yashasvi Jaiswal : विक्रमवीर यशस्वी! हंगामात धमाका करणाऱ्या जैसवालने ऋषभ पंतलाही टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal IPL Record : आयपीएलच्या 52 व्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालने नेहमीप्रमाणे राजस्थानला दमदार सुरूवात करून दिली. राजस्थानने 5 षटकातच आपले अर्धशतक धावफलकावर लावले. यशस्वी ज्या प्रकारे खेळत होता ते पाहून आजही यशस्वी मोठी खेळी करणार असे वाटते होते. मात्र मार्को येनसेनने त्याची 18 चेंडूत केलेली 35 धावांची खेळी पॉवर प्ले संपण्यापूर्वीच संपवली. मात्र ही खेळी संपण्यापूर्वी यशस्वी जैसवालने आयपीएलमध्ये इतिहास रचला.

आयपीएलच्या इतिहासातील भारताकडून सर्वात कमी वयात 1000 धावा पूर्ण करणारा यशस्वी जैसवाल दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने 21 वर्षे आणि 130 दिवस वय असताना आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. या यादीत पहिल्या क्रमांकावर ऋषभ पंत आहे. त्याने 20 वर्षे 218 दिवस वय असताना आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र जर या दोघांमध्ये डावांच्या बाबतीत तुलना केली तर पंतने 1000 धावा करण्यासाठी 35 डाव खेळले तर यशस्वीने 34 डावात ही कामगिरी केली.

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात 1000 धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी शॉ आहे. त्याने 21 वर्षे 169 दिवस वय असताना 44 डावात ही कामगिरी केली.

त्यानंतर संजू सॅसमनचा चौथा क्रमांक लागतो. त्याने 21 वर्षे 183 दिवस वय असताना हा कारनामा केला होता. यासाठी त्याने 44 डाव घेतले.

या यादीत पाचव्या स्थानावर देवदत्त पडिक्कल आहे. त्याने 21 वर्षे 285 दिव वय असताना 35 डावात आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT