Yashasvi Jaiswal RR vs CSK  esakal
IPL

RR vs CSK Yashasvi Jaiswal : @202! राजस्थानने सवाई मानसिंगवर कधी घडलं नाही ते करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

RR vs CSK Live : राजस्थान रॉयल्सने पॉईंट टेबलचे टॉपर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 202 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जैसवालने 43 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली. विशेष म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियमवर कोणालाही 200 धावाचा टप्पा पार करता आला नव्हता तो आज राजस्थानने संजू सॅमसनच्या 200 व्या सामन्यात पार केला. यशस्वीनंतर ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 35 धावांची खेळी करत राजस्थानला 202 धावा करण्यात मोठा हातभार लावला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने दोन विकेट्स घेतल्या.

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैसवालने आकाश सिंहच्या पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकत दमदार सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जैसवालने पहिल्या षटकातील आपला धडाका संपूर्ण पॉवर प्ले कायम ठेवत नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने जॉस बटलरसोबत 8 षटकात 86 धावांची सलामी दिली. त्यात बटलरचा वाटा 27 धावांचा होता. बटलर बाद झाल्यानंतर यशस्वीने संजू सॅमसनसोबत राजस्थानचे 10 व्या षटकात शतक धावफलकावर लावले.

यशस्वी जैसवालने धडाकेबाज खेळी करत राजस्थानला पहिल्या 10 षटकात 100 धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांना जोरदार पुनरागमन केले. तुषार देशपांडेने 14 व्या षटकात कर्णधार संजू सॅमसनला 17 धावांवर पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. त्यानंतर याच षटकात 43 चेंडूत 77 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जैसवालला माघारी धाडत राजस्थानच्या धावगतीला ब्रेक लावला.

राजस्थान शेवटची 5 षटके राहिली असताना 150 च्या जवळ होती. मात्र तिक्षाणाने राजस्थानचा हार्ड हिटर शिमरॉन हेटमायरला 8 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. यानंतर देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांनी आरसीबीचा डाव सावरत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली.

ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 35 धावा चोपल्या. मात्र तो 20 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने पडिक्कलसोबत पाचव्या विकेटसाटी 21 चेंडूत 48 धावांची भागीदारी रचली. पडिक्कलने 13 चेंडूत नाबाद 23 धावा करत राजस्थानला विक्रमी 202 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT