Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad esakal
IPL

RR vs SRH : राजस्थानच्या तिघांनीच उडवला धुरळा! यशस्वी - बटलरने केली सुरूवात तर संजूने केला शेवट

अनिरुद्ध संकपाळ

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad : राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध 20 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 214 धावा केल्या. राजस्थानकडून सलामीवीर जॉस बटलरने 95 धावांची खेळी केली तर संजू सॅमसनने 66 धावा ठोकत संघाला 200 पार पोहचवले. यशस्वी जैसवालनेही 18 चेंडूत 35 धावांची खेळी करत राजस्थानला चांगली सुरूवात करून दिली होती.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानाची स्टार सलामीवीर जोडी यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी धडाकेबाज सुरूवात केली. या दोघांनी पाचव्या षटकातच राजस्थानचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को येनसेनने 18 चेंडूत 35 धावा ठोकणाऱ्या यशस्वी जैसवालला बाद केले.

यशस्वी बाद झाल्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने देखील आक्रमक फलंदाजी करण्यास सूरवात केली. त्याला जॉस बटलर बॉल टू रन करत साथ देत होता. या दोघांनी 9 षटकात राजस्थानला 95 धावा करून दिल्या. यानंतर जॉस बटलरने देखील आपला गिअर बदलत आक्रमक फटके मारण्यास सुरूवात केली.

संजू सॅमसन आणि जॉस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. दरम्यान, बटलर आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता तर संजूने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. राजस्थानही 200 च्या जवळ पोहचला होता.

मात्र भुवनेश्वर कुमारने 95 धावांवर असलेल्या बटलरला पायचीत बाद केले. बटलरने 59 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारून ही खेळी सजवली. यानंतर संजूने 38 चेंडूत नाबाद 66 धावा ठोकत हेमटायरच्या साथीने 10 व्या षटकात राजस्थानला 200 च्या पार पोहचवले. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 214 धावा करत हैदराबादसमोर विजयासाठी 215 धावांचे मोठे आव्हान ठेवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT