Yuzvendra Chahal May Be Dropped From T20 World Cup 2024 Team India News sakal
IPL

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

T20 World Cup 2024 Team India Squad : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळणारे 15 खेळाडू कोण असतील याचे उत्तर जाणून घेण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India Squad : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळणारे 15 खेळाडू कोण असतील याचे उत्तर जाणून घेण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारताने 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता आणि या स्पर्धेचा हा पहिला हंगाम होता, परंतु तेव्हापासून भारताला एकदाही हे विजेतेपद पटकावता आलेले नाही. टी-20 वर्ल्ड कपचा नववा हंगाम वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळला जाणार आहे.

यावेळी वर्ल्ड कपमध्ये खेळणारी काही नावे पूर्णपणे निश्चित असली तरी काही जागांसाठी अनेक खेळाडूंमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. यामध्ये फिरकी विभागाचाही समावेश आहे. या वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंमध्ये किती फिरकीपटू असतील हे पाहणे बाकी आहे. आयपीएलमधील कामगिरी पाहता 33 वर्षीय युजवेंद्र चहलला पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळू शकते असे दिसत आहे.

पण चहलला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण या संघात काही फिरकीपटू आहेत ज्यांची निवड निश्चित आहे. यामध्ये पहिले नाव रवींद्र जडेजा आणि दुसरे नाव अक्षर पटेल आहे. हे दोघेही फिरकी अष्टपैलू आहेत आणि चांगली फलंदाजीही करतात.

15 सदस्यीय संघात फिरकीपटू म्हणून तिसरे नाव चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचे आहे, ज्याने आजकाल आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केल्यानंतर आयपीएल 2024 मध्येही चांगली कामगिरी केली आहे.

आणखी एक नाव समोर येत आहे ते म्हणजे रवी बिश्नोई, पण जर जडेजा, अक्षर आणि कुलदीप संघात आले तर त्यालाही संधी कमी आहे असे दिसते. आता या चौघांनंतर चहलचा नंबर येऊ शकतो जो शर्यतीत खूप मागे आहे.

युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीत कोणताही दोष नाही आणि तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील आहे. चहलने भारतासाठी आतापर्यंत 80 टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक 96 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रमही चहलच्या नावावर आहे ज्याने एका सामन्यात 25 धावांत 6 बळी घेतले.

चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे आणि आयपीएलच्या चालू मोसमातही त्याची गोलंदाजी धारदार होत आहे. या सर्व कामगिरीनंतरही चहलला संघात स्थान मिळणे शक्य वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Ganpati Visarjan 2025 Live Updates : 1935 पासून हरिनामाच्या गजरात निघते सार्वजनिक गणपतीची बैलगाडीतून मिरवणूक

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT