KKR vs RR Yuzvendra Chahal
KKR vs RR Yuzvendra Chahal  esakal
IPL

KKR vs RR : युझीचा विकेट्सचा चौकार! फिरकीसमोर केकेआरने जोडले हात

अनिरुद्ध संकपाळ

KKR vs RR Yuzvendra Chahal : राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला 149 धावात रोखले. राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहलसमोर केकेआरच्या भल्या भल्या फलंदाजांनी हातच टेकले. युझवेंद्र चहलने नितीश राणा (22), व्यंकटेश अय्यर (57), शार्दुर ठाकूर (1) आणि रिंकू सिंह (16) यांची शिकार केली. याचबरोबर युझवेंद्र चहल हा आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला. केकेआरकडून संथ सुरूवात करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावा केल्या.

आपल्या होम ग्राऊंडवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थानचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टने पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. बोल्टने सलामीवीर जेसन रॉयला 10 धावांवर तर रहमनुल्ला गुरबाजला 18 धावांवर बाद केले. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर केकेआरला पॉवर प्लेमध्ये 37 धावांपर्यंतच मजल मारता आली. व्यंकटेश अय्यरने तर 12 चेंडूत फक्त 2 धावाच केल्या.

पॉवर प्लेमधील संथ सुरूवातीनंतर नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी केकेआरचा डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. अय्यरनेही आपपला गिअर बदलला होता. मात्र ही जोडी युझवेंद्र चहलने फोडली. त्याने राणाला 22 धावांवर बाद केले. यानंतर आक्रमक झालेल्या अय्यर आणि आंद्रे रसेल यांनी केकेआरला 13 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र त्यानंतर केएस आसिफने रसेलला 10 धावांवर बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला.

दरम्यान, व्यंकटेश अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र 42 चेंडूत 57 धावा करणाऱ्या अय्यरचा चहलनेच काटा काढला. अय्यर बाद झाला त्यावेळी केकेआरच्या 16 षटकात 5 बाद 127 धावा झाल्या होत्या. अय्यर पाठोपाठ चहलने शार्दुल ठाकूरला 1 धावेवर बाद करत केकेआरला सहावा धक्का दिला.

युझवेंद्र चहलने आपल्या तिसऱ्या षटकात व्यंकटेश अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांची शिकार केली होती. त्याने चौथ्या षटकात रिंकू सिंहची (16) शिकार करत केकेआरला अजून एक मोठा धक्का दिला. यानंतर संदीप शर्माने शेवटच्या षटकात फक्त 7 धावा देत केकेआरला 20 षटकात 8 बाद 149 धावात रोखले.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT