Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Bihu dance  esakal
IPL

VIDEO : चहलच्या पत्नीसोबत रियान परागने केला 'बीहू डांस'

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) धडाकेबाज कामगिरी करत आहे. तो प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकत आहे. दरम्यान, त्याची पत्नी (Wife) धनश्री वर्मा (Dhanashree Verma) देखील त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उपस्थित असते. धनश्री वर्मा ही एक उत्तम डान्सर आहे. त्यामुळे तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. यापूर्वी धनश्रीने भारतीय संघातील खेळाडू श्रेयस अय्यर सोबत ठुमके लगावले होते. आता तिने राजस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग (Riyan Parag) सोबत पांरपरिक 'बीहू डांस' (Bihu dance) स्टेप्स केल्या. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. धनश्रीने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत 'खूप सुंदर आणि मजेशीर असमिया' असे कॅप्शनही दिले.

बीहू डान्स हा आसामचे लोकनृत्य आहे. रियान हा मुळचा आसामचा असल्याने त्याला बिहू डान्स यतो. आता हाच डान्स त्याने उत्तम डान्सर असलेल्या धनश्री सोबत केला. तो चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. दरम्यान, युजवेंद्र चहल मैदानात आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना नाचवत आहे. त्याने आतापर्यंत 5 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. युजवेंद्र चहलला आरसीबीने रिटेन केले नव्हते. त्याला ऑक्शनमध्ये राजस्थानने 6.50 कोटी रूपये बोली लावत आपल्या गोटात खेचले. दुसरीकडे रियान परागला मात्र यंदाच्या हंगामात अजून सूर गवसलेला नाही. त्याला 5 सामन्यात फक्त 43 धावाच करता आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मानरच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT