IRE vs IND t20 Jasprit Bumrah 
क्रीडा

IRE vs IND: 'ही तर मोठी डोकेदुखी...', मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार बुमराह नाराज

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah Ireland Vs India : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात आयर्लंडचा पराभव करून मालिका खिशात घातली. टीम इंडियाने डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने आयर्लंडसमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून यजमानांना 8 गडी गमावून केवळ 152 धावा करता आल्या. मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार बुमराहने मोठे वक्तव्य केले.

टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने त्याच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी काय आहे याचा मोठा खुलासा केला. सामना जिंकल्यानंतर कर्णधार बुमराह म्हणाला की, 'मला चांगले वाटत आहे. आज खेळपट्टी थोडी कोरडी होती. त्यामुळे प्रथम फलंदाजी केली. पण प्लेइंग-11 निवडणे खूप कठीण काम आहे आणि मोठी डोकेदुखी आहे. प्रत्येकजण उत्सुक आहे. आम्हा सर्वांना भारतासाठी खेळायचे आहे. शेवटी, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतात.

बुमराह पुढे म्हणाला, 'जर तुम्ही अपेक्षांचे ओझे घेऊन खेळत असाल तर तुमच्यावर दबाव असतो. त्या अपेक्षा बाजूला ठेवाव्या लागतील. तुम्ही इतक्या अपेक्षा घेऊन खेळत असाल तर तुम्ही स्वतःला 100 टक्के न्याय देत नाही.

जसप्रीत बुमराहने पहिल्या सामन्यात दोन विकेट घेत दुखापतीतून शानदार पुनरागमन केले. त्याचवेळी दुसऱ्या टी-20मध्येही बुमराहने चार षटकात 15 धावा देत 2 विकेट घेतल्या. बुमराह सध्या पूर्णपणे आपल्या लयीत दिसत आहे. तो भारतासाठी आशिया आणि विश्वचषकातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT