Irfan Pathan Give Strong Reply To Pakistan Prime Minister esakal
क्रीडा

Irfan Pathan : तुमच्यात अन् आमच्यात हाच फरक आहे! इरफान पठाणनं पाक पंतप्रधानांची लायकी दिली दाखवून

अनिरुद्ध संकपाळ

Irfan Pathan Give Strong Reply To Pakistan Prime Minister : टी 20 वर्ल्डकप 2022 सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा तब्बल 10 विकेट्सनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कुत्सित भावनेने एक ट्विट केलं होत. या ट्विटवरून त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली. आता तर भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना लायकीच दाखवून दिली.

इंग्लंडचे सलामीवीर जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी भारताचे 169 धावांचे आव्हान 16 व्या षटकातच बिनबाद पार केले. भारताचा सेमी फायनलमध्ये दारूण पराभव झाला. यामुळे भारत आणि पाकिस्तान अशी वर्ल्डकपची ड्रीम फायनल होता होता राहिली. मात्र भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.

शाहबाज शरीफ यांनी 'तर रविवारी आता 152/0 Vs 170/0 #T20WorldCup' असे ट्विट केले होते. पाकिस्तानने गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारताचे 152 धावांचे आव्हान बिनबाद पार केले होते. यंदाच्या टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये इंग्लंडने सेमी फायनल सामन्यात भारताचे 169 धावांचे आव्हान 16 षटकात बिनबाद पार करत अंतिम फेरी गाठली होती. याचाच आधार घेत शरीफ यांनी खोचक ट्विट केले.

याला आता इरफान पठाणने चोख प्रत्युत्तर देत त्यांची लायकीच दाखवली. इरफान पठाणने ट्विट केले की, 'तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही तुमच्या आनंदात आनंदी मात्र तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी. यामुळेच स्वतःच्या देशाला चांगल्या स्थितीत नेण्यावर लक्षच नाहीये.'

दरम्यान, शनिवारच्या पत्रकार परिषदेत बाबर आझमला अशा सोशल मीडिया पोस्टमुळे तुमच्यावर अधिकचा दबाव येतो का असे विचारण्यात आले. त्यावेळी त्याने 'अशा प्रकारचा कोणता दबाव नसतो. मात्र माफ करा मी हे ट्विट पाहिलेले नाही. त्यामुळे मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र आम्ही आमच्या प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो.' अशी प्रतिक्रिया दिली. बाबर आझमने एकप्रकारे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या खोडसाळपणाला जास्त हवा न देण्याचा पवित्रा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT