Ishan Kishan KS Bharat IND vs AUS 4th Test  esakal
क्रीडा

IND vs AUS 4th Test : फक्त तीन सामनेच! चौथ्या कसोटीत भरतला डच्चू इशान किशनला मिळणार संधी?

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan KS Bharat IND vs AUS 4th Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील चौथा आणि शेवटचा सामना उद्यापासून अहदमाबाद येथे सुरू होत आहे. तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपुढे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. त्यामुळे आता चौथ्या कसोटीत भारतीय फलंदाजीत काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत केएस भरतने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले. तब्बल दीड वर्षे कसोटी संघासोबत दौरे करणाऱ्या केएस भरतला अखेर पदार्पणाची संधी मिळाली. मात्र अवघ्या तीन कसोटीत संधी मिळाल्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय संघाने ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर कसोटी संघातील त्याची रिप्लेसमेंट म्हणून पहिली पसंती ही बराच काळ आपल्या संधीची वाट पाहत असणाऱ्या केएस भरतला दिली. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पिहल्या सामन्यात त्याने कसोटी पदार्पण केले. मात्र टीम इंडियाने बॅकअप म्हणून इशान किशनचा देखील कसोटी संघात समावेश केला.

पहिल्या तीन कसोटीत केएस भरतला संधी दिली. या कसोटीत त्याला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच फिरकीला साथ देणाऱ्या, उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर भरतला किपिंग करताना अडचणी येत असल्याचेही जाणवत होते. यामुळेच आता चौथ्या कसोटीत इशान किशनला संधी मिळेल अशी चर्चा सुरू आहे. इशानला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

भरतसाठी रोहितचे 'ते' वक्तव्यच शेवटची आशा

दरम्यान, या कसोटी मालिकेवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माला केएस भरतविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर पदार्पण करणे सोपे नसते. याबाबत मी केएस भरतशी बोललो आहे. त्याला पदार्पणातच तुला आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर खेळायचं असल्याची कल्पना दिली होती. पदार्पणातच अशा खेळपट्ट्यांवर खेळणे सोपे नसते. त्यामुळे आम्ही त्याला विश्वासात घेऊन तुला संपूर्ण संधी दिली जाईल असे सांगितले होते.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT