ishan kishan sakal
क्रीडा

Ishan Kishan : शतक हुकल्यानंतर इशान किशनचे डोळे पाणावले - Video

इशान किशनचे पहिले शतक हुकवले...

Kiran Mahanavar

Ishan Kishan India vs South Africa 2nd odi : रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयात मोठी भूमिका बजावणाऱ्या टीम इंडियाच्या युवा स्फोटक फलंदाज इशान किशनचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. या सामन्यात केवळ 7 धावांनी त्याचे शतक हुकले.

टीम इंडियाचा युवा स्फोटक फलंदाज इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये 84 चेंडूत 93 धावा केल्या. इशान किशनच्या या स्फोटक खेळीत 4 चौकार आणि खोचक असे लांब सात षटकार मारले. इशान किशनने श्रेयस अय्यरसोबत 161 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला सामना जिंकता आला. मात्र, या सामन्यात इशान किशनचे पहिले वनडे शतक हुकले. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ब्योर्न फोर्टिनने वैयक्तिक 93 धावांवर इशान किशनला झेलबाद केले. इशान आपले पहिले एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक अवघ्या 7 धावांनी हुकल्यानंतर खूप भावूक झाला.

इशान किशनने बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर बसून राहिला. इशान किशन काही सेकंदांनी उठतो आणि मैदानाबाहेर गेला. मैदान सोडत असताना त्याचे डोळे पाणावले होते. इशान किशनच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सात विकेट गमावत 278 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 45.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करताना नाबाद 113 धावा केल्या. तर इशान किशनने 93 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT