Ishan Kishan World cup 2023 
क्रीडा

Ind vs Afg : ईशान किशन ठरतोय अवघड जागेचं दुखणं…; शुभमनच्या अनुपस्थितीमुळे रोहित ब्रिगेडचा 'बिघडला गेम'

Kiran Mahanavar

Ishan Kishan World cup 2023 : एकदिवसीय वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली खरी पण टीम इंडियाने अवघ्या 2 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या.

कर्णधार रोहित शर्मा (0) आणि इशान किशन (0) हे दोन्ही सलामीवीर खातेही उघडू शकले नाहीत. यानंतर आलेला श्रेयस अय्यर (0) ही 'तू चल में आया'च्या धर्तीवर बाद झाला. त्या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर पूर्णपणे धुव्वा उडाला. एकेकाळी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 2 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या.

विराट कोहली (85) आणि केएल राहुल (नाबाद 97) त्यांनी टीम इंडियाला बुडण्यापासून वाचवले. डेंग्यूमुळे शुभमन गिल पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. अशा परिस्थितीत इशान किशनला पुन्हा एकदा सलामीची संधी मिळाली. शुभमनच्या जागी इशान किशनला आक्रमक फलंदाजी करण्याची संधी होती, मात्र त्याला या संधीचे सोने करता आले नाही.

इशान किशनने अत्यंत खराब शॉट खेळला आणि मिचेल स्टार्कच्या चेंडूवर स्लिपमध्ये आऊट झाला. अशा स्थितीत वर्ल्डकपमध्ये पदार्पणाच्या सामन्यात तो फ्लॉप ठरला. इशान किशनची अलीकडची कामगिरी काही खास राहिली नाही. त्याने शेवटच्या 10 डावांपैकी 7 वेळा फलंदाजी केली, ज्या दरम्यान तो फक्त एक अर्धशतक (82 धावा) करू शकला.

मात्र, इशान किशन या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे, त्याने या डावात केवळ 52 धावा केल्या. इशान किशनच्या ODI रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 26 सामन्यांच्या 23 डावात 42.19 च्या सरासरीने आणि 102.30 च्या स्ट्राईक रेटने 886 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT