ISSF Shooting World Cup Shahu Tushar Mane Mehuli Ghosh Won Gold Medal In 10m Air Rifle Mixed Team  esakal
क्रीडा

ISSF Shooting World Cup : शाहू तुषार माने, मेहुली घोष यांचा सुवर्णवेध

अनिरुद्ध संकपाळ

चँगवॉन : भारताच्या मेहुली घोष (Mehuli Ghosh) आणि शाहू तुषार माने (Shahu Tushar Mane) यांनी ISSF Shooting World Cup मध्ये 10 मीटर एअर रायफल ( मिश्र सांघित प्रकारात भारताला सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून दिले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. याचबरोबर भारताची दुसरी जोडी पलक आणि शिवा नरवाल यांनी 10 मीटर एअर पिस्टलच्या मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मेहुली आणि शाहू तुषार माने यांनी हंगेरीची जोडी एझ्टर मेसझारोस आणि इस्तवान पेनचा 17 - 13 असा पराभव केला. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक (10m Air Rifle Mixed Team) प्रकारात तिसऱ्या स्थानावर इस्त्राईलची आणि चौथ्या स्थानावर चेक रिपब्लिकची जोडी राहिली.

शाहू तुषार मानेचे हे भारताकडून वरिष्ठ स्तरावरील पहिले सुवर्ण पदक आहे. तर मेहिलीने आपले दुसरे सुवर्ण पदक पटकावले. यापूर्वी तिने 2019 च्या साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

मिश्र पिस्टल प्रकारात पलक आणि शिवा यांनी कझाकिस्तानच्या इरिना लोक्तीओनोव्हा आणि वॅलेरिये राखीमझानचा 16 - 0 असा पराभव केला. हा सामना एतर्फी झाला. बुधवारच्या या सुवर्ण कामगिरीनंतर भारताने पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पदक तालिकेत सर्बिया दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकून पहिल्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT