esakal
esakal
क्रीडा

बॅड पॅचमधून जाणाऱ्या अजिंक्यला बसला अजून एक मोठा धक्का

धनश्री ओतारी

आयपीएल स्पर्धेचा महत्त्वाचा टप्पा सुरु असतानाच अजिंक्य राहाणे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. नुकतंच मागील आठवड्यात आयपीएलचा सांगता सोहळा पार पडला. मात्र, तो अद्याप पुर्णपणे फिट झालेला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी रहाणेला सात आठ आठवडा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रहाणेला हॅमस्ट्रींगची दुखापत झाली आहे. ही दुखापत इतकी गंभीर आहे की, त्याला पुढचे सात आठ आठवडे मैदानात पाऊल ठेवता येणार नाही. दरम्यान, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत,"ही दुखापत दुर्दैवी होती. पण माझ्यावर तंदरुस्त होण्याचे उपचार चांगले चालले आहेत. मी बरा होत आहे. मी बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सुमारे 10 दिवस राहिलो आणि आता पुन्हा तंदरुस्त होण्यासाठी तिथं जात आहे. अशी माहिती रहाणेने दिली.

तसेच, “सध्या माझे सर्व लक्ष तंदरुस्त होऊन मैदानात उतरण्यावर आहे. मला माहित नाही की मी कधी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, यासाठी सात-आठ आठवडे लागतील, पण सध्या मी एका दिवसावर, एका आठवड्यावर लक्ष केंद्रित करत आहे," अशी प्रतिक्रिया रहाणेने दुखापतीवर दिली.

पुण्यात झालेल्या १४ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाली. स्कॅनमधून त्याला हॅमस्ट्रींगची दुखापत झाली असल्याचे स्पष्ट झालं.

यंदाच्या सीझनमध्ये रहाणे विशेष काही करु शकला नाही. त्याने सात डावात फक्त १३३ धावा केल्या. १९ च्या सरासरीने त्याने या धावा केल्या. केकेआरने त्याला बेस प्राइसला म्हणजे केवळ १ कोटी रुपयांना विकत घेतलं.

गेल्या काही महिन्यांपासून रहाणे फॉर्ममध्ये नाही. दक्षिण अफ्रिकेतील कसोटी मालिकेत खराब कामगिरीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून डच्चू मिळाला होता. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये त्याला प्रभावी कामगिरी करण्याची संधी होती. दक्षिण अफ्रिका दोरा सुरु होण्याआधीपासून रहाणे सातत्याने खराब फॉर्मचा सामना करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT