esakal
क्रीडा

फिल्डिंग करताना डोक्याला गंभीर जखम, मैदानातच कोसळला इंग्लंडचा खेळाडू

इंग्लंड आणि न्यूझीलंड टेस्ट सीरीजदरम्यान इंग्लंडला मोठा धक्का बसला.

धनश्री ओतारी

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची टेस्ट सीरीज खेळवण्यात येत आहे. दरम्यान, टेस्ट सीरीजचा पहिला सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवण्यात येत आहे. मात्र, पहिल्याच सामन्यात इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंल्गंडचा लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज जॅक लीच गंभीर जखमी झाला आहे.

जॅक लीच गंभीर जखमी

फिल्डींग दौऱ्यादरम्यान जॅक लीच गंभीर जखमी झाला आहे. खेळाडू थेट जमिनीवर कोसळला. जॅक लीच यानंतर टेस्ट मॅचमधून बाहेर पडला. त्याच्या जागी स्पिनर मॅथ्यू पार्किंसनला संधी देण्यात आली.

फिल्डींग दौऱ्यादरम्यान डोक्याला जखम

पहिल्या दिवशीच्या पाचव्या षटकात ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेने दमदार फटका लगावला. हा चेंडू चौकार जाईल, असे वाटत होते. पण त्याचवेळी इंग्लंडचा जॅक लीच हा या चेंडूचा पाठलाग करत होता. पाठलाग करत असताना जॅक हा चेंडू पकडेल, असे वाटत होते. जॅकने यावेळी चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी जॅकच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तो थेट मैदानातच कोसळला.

त्याची दुखापत पाहून इंग्लंडबरोबरच न्यूझीलंडच्या डॉक्टरांनीही मैदानात धाव घेतली आणि जॅकची तपासणी केली. त्यानंतर त्याला उपचारासाठी बाहेर नेण्यात आलं.

जॅक सामन्यातून आऊट

या दुखापतीमुळे आता जॅक या सामन्यातून आऊट झाला आहे, दुखापतीमुळे त्याला आता हा सामना खेळता येणार नाही. जॅकच्या जागी आता इंग्लंडच्या संघात मॅथ्यू पार्किसनची निवड करण्यात आली आहे, त्याचा हा पहिलाच सामना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT