James Anderson  esakal
क्रीडा

Ashes : पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडची धडाडणारी तोफच निकामी

Ashes : जेम्स अँडरसन पहिल्या कसोटीला मुकणार

अनिरुद्ध संकपाळ

ब्रिसबेन : ऑस्ट्रेलियात येत्या 8 डिसेंबरपासून अॅशेस ( Ashes ) कसोटी मालिका सुरु होत आहे. मात्र पहिल्या कसोटीपूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला असून त्यांची कसोटीतील धडाडणारी तोफच निकामी झाली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला ( James Anderson ) इंग्लंड संघप्रशासनाने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेम्स अँडरसनच्या पायाला दुखापत झाली आहे.

अॅशेस ( Ashes ) मालिकेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ( AUS vs ENG ) पहिला कसोटी सामना गाबा येथे उद्यापासून सुरु होत आहे. दरम्यान, सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार जेम्स अँडरसच्या ( James Anderson ) पायाचे स्नायू अखडले आहेत. 2019 च्या अॅशेस मालिकेतही त्याला हीच समस्या जानवत होती. त्यामुळे इंग्लंड संघाच्या संघव्यवस्थापनाने अँडरसनला पहिल्या कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन अँडरसन गुलाबी चेंडूवरील अॅडलेड कसोटीसाठी उपलब्ध होईल.

दरम्यान, इंग्लंड संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले की अँडरसनला ( James Anderson ) कोणतही दुखापत नाही. संघव्यवस्थापनाने आपल्या वक्तव्यात म्हटले की, 'जिमी हा खेळण्यासाठी एकदम फिट आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. आम्ही सहा आठवड्यात पाच कसोटी सामने खेळणार आहोत. त्यामुळे आम्ही त्याला दुसऱ्या कसोटीसाठी राखून ठेवणार आहे. स्वतः अँडरसन आणि संघव्यवस्थापनाची 2019 मध्ये एजबेस्टन कसोटीत जे झाले ते पुन्हा होऊ नये अशी इच्छा आहे. त्यावेळी अँडरसन पहिल्या दिवशीच दुखापतग्रस्त झाला होता.'

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारीच अॅशेस ( Ashes ) मालिकेतील पाचवी कसोटी कोरोनाच्या निर्बंधांमुळे पर्थ स्टेडियमवरून दुसरीकडे हलवण्यार असल्याचे सांगितले होते. पाचवी कसोटी कोठे खेळवायची याबाबत अजून चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT