James Garner could be a next David Beckham for Manchester United  Esakal
क्रीडा

VIDEO: मँचेस्टर युनायटेडला बेकहमचा वारसदार मिळाला?

अनिरुद्ध संकपाळ

डेव्हिड बेकहम (David Beckham) हा मँचेस्टर युनायटेडचा स्टार खेळाडू होता. मात्र बेकहमनंतर मँचेस्टरला त्याच्यासारखा फुटबॉल खेळाडू अजूनपर्यंत मिळाला नव्हता. मात्र आता ही प्रतिक्षा संपण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या लोनवर नॉटिंगहॅम फॉरेस्टकडून खेळणाऱ्या जेम्स गारनेर (James Garner) या 20 वर्षाच्या मिडफिल्डरकडे मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) पुढचा डेव्हिड बेकहम म्हणून पाहिले जात आहे.

गेल्या महिन्यातील ट्रन्सफर विंडोमध्ये मँचेस्टर युनायटेडने जेम्स गारनेरला परत बोलवण्याबाबत चर्चा देखील केली होती. मात्र नंतर त्याला नॉटिंगहॅम फॉरेस्टमध्येच (Nottingham Forest) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तो पुढचा हंगाम मँचेस्टर युनायडेटकडून खेळण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, एफए कपच्या चौथ्या फेरीत जेम्स गारनेर लीसेस्टर सिटीविरूद्ध खेळत होता. त्यावेळी त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. मॅचेस्टर सिटीकडून खेळेल्या ट्रेव्हर सिंक्लेयरला (Trevor Sinclair) जेम्स गारनेरचा खेळ आवडला.

ट्रेव्हरने फॉरेस्टकडून खेळणाऱ्या गारनेरमध्ये मँचेस्टर युनायडेटचा पुढचा डेव्हिड बेकहम दिला. तो एका स्पोर्ट्स शोमध्ये म्हणाला की, 'जेम्स गारनेरचे फटके मला डेव्हिड बेकहमची आठवण करून देतात. त्याच्याकडे ती डीप (Dip) आहे. त्याचा वेग हा समोरच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. तो संघातील इतर पुढच्या फळीत खेळणाऱ्या खेळाडूंबरोबर चांगले ट्युनिंग तयार करतो. त्याच्या भात्यात जबरदस्त क्रॉस (Cross) फटके आहेत.'

गारनेर आता फॉरेस्टकडून चॅम्पियनशिपमधला पुढचा सामना ब्लॅकबर्न रोव्हर्स विरूद्ध ईवूड पार्कमध्ये बुधावारी खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Rupee Fall : ऐतिहासिक नीचांक! रुपया 91 पार; 1 डॉलर = 91.07 रुपये! कारण काय? महागाई वाढणार का?

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

SCROLL FOR NEXT