IND vs AUS Jarvo  esakal
क्रीडा

IND vs AUS Jarvo : भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यात 'इंग्लंड'ची घुसखोरी; विराट अन् केएलनं दिला चांगलाच दम

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS Jarvo : भारत आणि ऑस्ट्रेलिया हा हाय व्होल्टेज सामना सुरू असतानाच चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर घुसखोरी झाली. ही घुसखोरी कोणी अनोळखी व्यक्ती केली नाही. हा व्यक्ती मैदानात घुसखोरी करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. जार्वो 69 नावाची जर्सी घालणाऱ्या या व्यक्तीने पुन्हा एकदा मैदानात धाव घेतली.

इंग्लंड क्रिकेटचा हा चाहता टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात घुसला होता. मात्र त्याला सुरक्षा रक्षकांनी त्वरित मैदानातून बाहेर नेले. यावेळी विराट कोहली आणि केएल राहुलने देखील जार्वोला चांगलाच दम दिला.

क्रिकेटच्या मैदानात इंग्लंडच्या या जर्वो नावाची जर्सी घातलेल्या व्यक्तीने पहिल्यांदाच घुसखोरी केलेली नाही. हा क्रिकेट फॅन भारत 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना देखील मैदानात सतत घुसखोरी करत होता. त्याने कसोटी सामन्यात सलग तीनवेळा घुसखोरी केली होती. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर आजीवर बंदी घातली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताने 5 धावावर मिचेल मार्शच्या रूपाने त्यांना पहिला धक्का दिला.

यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सावध फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. अखेर ही जोडी कुलदीप यादवने फोडली. त्याने वॉर्नरला 41 धावांवर बाद केले. त्यानंतर स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी कांगारूंना 25 षटकात शतक पार करून दिले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: सोलापूरच्या राजकारणात भूकंप, ३ दिग्गजांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले...

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT