Jasprit Bumrah ICC Test Ranking
Jasprit Bumrah ICC Test Ranking esakal
क्रीडा

Jasprit Bumrah ICC Ranking : रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठत जसप्रीत बुमराहने इतिहास रचला

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah ICC Test Ranking : आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकवले आहे. इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने 9 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे आयसीसी कसोटी बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराह हा खेळपट्टी सपाट, हिरवी गार, संथ असली तरी दमदार गोलंदाजीच करतो. त्याने भारतात आणि परदेशातील खेळपट्ट्यांवर देखील वर्चस्व गाजवलं आहे. तो सध्या जगावर राज्य गाजवत आहे.

भारताच्या 30 वर्षाच्या जसप्रीत बुमराहने विशाखापट्टणम कसोटीत वेगवान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी नसतानाही 9 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. त्यानंतर त्याच्या आयसीसी रँकिंगमध्ये मोठी प्रगती करत अव्वल स्थान पटकावलं. त्याने विचंद्रन अश्विन, पॅट कमिन्स आणि कगिसो रबाडा रयांना मागं टाकलं.

ज्याने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा जसप्रीत बुमराह हा भारताचा चौथा गोलंदाज आहे. यापूर्वी बिशन सिंग बेदी, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाने अशी कामगिरी केली होती.

आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठणारे भारतीय खेळाडू

फलंदाजी

कसोटी : सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली

वनडे : सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शुभमन गिल

टी 20 : गौतम गंभीर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव

गोलंदाजी

कसोटी : बिशनसिंग बेदी, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह

वनडे : कपिल देव, मनिंदर सिंग, अनिल कुंबळे, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

टी 20 : जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई

अष्टपैलू खेळाडू

कसोटी : कपिल देव, अश्विन, रविंद्र जडेजा

वनडे : कपिल देव

जसप्रीत बुमराहला इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. त्याच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर 106 धावांनी भारताने विजय मिळवला.

बुमराहने11 महिन्यापासून अव्वल स्थान आपल्या खिशात ठेवणाऱ्या अश्विनची मक्तेदारी संपवली. बुमराहने 881 रेटिंग पॉईंट्स मिळवले असून तर अश्विनचे 904 आणि रविंद्र जडेजाचे 899 रेटिंग पॉईंट्स आहेत. आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय गोलंदाजांचेच वर्चस्व आहे. या तिघांचे मिळून सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स झाले आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT