Jasprit Bumrah Record sakal
क्रीडा

Jasprit Bumrah : BCCI ने बुमराह बाबत घेतला मोठा निर्णय...

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळल्या जात आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून ट्रॉफी कायम ठेवली आहे. आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात आहे. त्याचवेळी, या सगळ्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सलाही मोठा फटका बसला आहे. बीसीसीआयचे लक्ष सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त करण्यावर आहे.

अशा परिस्थितीत बुमराह आता पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला जाणार आहे. जसप्रीत बुमराह पाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यूझीलंडला जाऊ शकतो. NCA आणि BCCI च्या वैद्यकीय पथकाने न्यूझीलंडच्या एका सर्जनची निवड केली आहे ज्याने बुमराहच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी स्टार इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर देखील उपचार केले होते.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून पाठीच्या समस्येमुळे तो क्रिकेटपासून दूर होता. मात्र, आता बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली तर त्याला बरे होण्यासाठी सुमारे 20 ते 24 आठवडे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

बाबो...! 'हा' अभिनेता चक्क विकतोय सिलेंडर, १० लाख रुपयांना एक सिलेंडर आणि...

Latest Marathi News Live Update : धुळ्यात गॅस टंचाईमुळे लाकडांची विक्री वाढली

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

SCROLL FOR NEXT