jasprit bumrah sakal
क्रीडा

IND vs AUS : बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार?, कोण होणार बाहेर

कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचारात....

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah in Team India : भारतीय संघ आता शुक्रवारी दूसऱ्या टी-20 सामन्यातसाठी नागपुरमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत नागपुरातील पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचार करू शकतात, असेही मानले जात आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्राने नागपूर टी-20 मध्ये बुमराहच्या निवडीबद्दल सांगितले की, संघ व्यवस्थापन त्याच्याबद्दल घाई करू इच्छित नाही, म्हणूनच बुमराहने मोहाली टी-20 खेळला नाही. पण तो नेटमध्ये गोलंदाजी करत असून तो अॅक्शनसाठी सज्ज आहे. जसप्रीत बुमराहने नागपूरटी-20 मध्ये पुनरागमन केले तर उमेश यादव बाहेर जाणे निश्चित आहे. उमेश आगामी विश्वचषक संघाचा भाग नाही, मालिका सुरू होण्यापूर्वी कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाल्याने संघाबाहेर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तसेच आशिया कपमध्ये तो टीम इंडियाचा भाग नव्हता. एनसीएमध्ये पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर बुमराह आता संघात परतला आहे.

संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बुमराहच्या दुखापतीबद्दल म्हणाला, तो काय करू शकतो आणि तो आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. काही चिंता असू शकतात, परंतु ही समस्या नाही. आम्हाला आमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवायला हवा. हे देशातील सर्वोत्तम 15 खेळाडू आहेत. जसप्रीत तिथे नसल्यामुळे खूप फरक पडतो. तो दुखापतीतून पुनरागमन करत आहे. त्याला पुनरागमन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आणि त्याच्यावर जास्त दबाव न आणणे हे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा केंद्राचा निर्णय

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT