Jasprit Bumrah Mohammed Shami Deepak Chahar T20 World Cup 2022 esakal
क्रीडा

Jasprit Bumrah : बुमराह तो बुमराहच! शमी - चाहर त्याची जागा घेऊ शकणार?

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah Mohammed Shami Deepak Chahar : भारतीय टी 20 संघाला वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच दुखापतींनी ग्रासले आहे. आशिया कपवेळी रविंद्र जडेजाला दुखापत झाली अन् तो टी 20 वर्ल्डकपला मुकला. या धक्क्यातून सावरतोय न सोवरतोय तोच भारताचे प्रमुख अस्त्र जसप्रीत बुमराहच्या पाठदुखीने उचल खालली अन् तोही वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता आहे. अक्षर पटेलच्या रूपात जडेजाची रिप्लेसमेंट आपल्याला मिळाली. मात्र जसप्रीत बुमराह नसण्याने मोठी पोकळी निर्माण होणार आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी आणि दीपक चाहर या दोघांची नावे सध्या चर्चेत आहेत. मात्र बुमराह तो बुमराहचं!

  • पॉवर प्लेमध्ये धावांचा धडाका रोखण्यासाठी भारतीय कर्णधाराकडे जसप्रीत बुमराह हे एक अस्त्र होते. जसप्रीत बुमराह पॉवर प्लेमध्ये कर्णधाराला एकादुसरी विकेट काढून द्यायचा त्यामुळे समोरच्या गोलंदाजावरचेही दडपण दूर व्हायचे.

  • डेथ ओव्हरमधील दोन षटके ही जसप्रीत बुमराहच टाकणार हे निश्चित असायचं. तो भारताचा डेथ बॉलिंग स्पेशालिस्ट आहे. त्याच्या अनुपस्थितीत डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करतानाच्या भारताच्या मर्यादा उघड्या पडल्या होत्या.

  • जर सामना सुपर ओव्हरमध्ये गेलाच तर ते षटक टाकणारा आपला हुकमी एक्का जसप्रीत बुमराह असायचा. मात्र आता भारतीय कर्णधाराला पर्याय शोधावा लागणार आहे. तो पर्याय बुमराह इतकाच यशस्वी होईल की नाही हे देखील काळच ठरवेल.

  • जसप्रीत बुमराह हा असा गोलंदाज होता जो परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल तो भेदक माराच करायचा. टीम इंडियाचा तो ऑल सिजन गोलंदाज होता. जसप्रीत बुमराह चेंडू स्विंग होत असो वा नसो, खेळपट्टी बाऊन्सी असो वा नसो तो टिच्चून मारा करतो.

  • बुमराह कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी मारा करण्याची क्षमता ठेवत असला तरी त्याच्यासाठी ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या म्हणजे सोने पे सुहागा अशाच होत्या. त्याने ऑस्ट्रेलियात 6 टी 20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. 23 धावात 3 विकेट्स हे त्याची ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून शमी आणि चाहर या दोघांनी नावे चर्चेत आहेत. शमी हा देखील बुमराहसारखा स्ट्राईक बॉलर आहे. तो विकेट्स घेऊन देतो मात्र धावाही देतो. त्याची डेथ बॉलिंग बुमराह इतकीच प्रभावी आहे असं आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही.

दुसरीकडे दीपक चाहर देखील चेंडू नवीन असताना प्रभावी मारा करतो. चेंडू स्विंग होत असेल तर चाहर कधीही घातकच. मात्र ऑस्ट्रेलियातील विकेट या सीम बॉलिंगला पोषक असतात. त्यात चहर देखील स्पशलिस्ट डेथ बॉलर नाही.

त्यामुळे डेथ बॉलिंगसाठी भारतासमोर फॉर्मसाठी चाचपडत असलेल्या हर्षल पटेल आणि युवा अर्शदीपवर विसंबून रहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT