Jasprit Bumrah Injury sakal
क्रीडा

Jasprit Bumrah Injury : T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह जखमी

भारताच्या स्टार गोलंदाजाची ही कामगिरी आणि खराब फिटनेस ही संघासाठी मोठी चिंतेची बाब

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah Injury : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकदरम्यान सांगितले की, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुन्हा दुखापत झाली आहे. तो मालिकेतील पहिला सामना खेळणार नाही. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी टी-20 विश्वचषकापूर्वी बुमराहची वारंवार होणारी दुखापत हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे.

बुमराहला मंगळवारी सराव सत्रादरम्यान पाठदुखीचा त्रास झाल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांची देखभाल करत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही बुमराह पहिला सामना खेळला नाही. यानंतर त्याच्या तंदुरुस्तीबाबत भरपूर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आले होते, मात्र तो त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकला नाही. बुमराहने दोन टी-20 सामन्यांमध्ये एकूण सहा षटके टाकली आणि 73 धावा दिल्या. यादरम्यान त्याला एकच विकेट मिळाली. याआधी दुखापतीमुळे तो आशिया कपमध्येही खेळला नव्हता.

टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने जसप्रीत हा भारताचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. पण यावर्षी भारतासाठी तो फक्त पाच टी-20 सामने खेळला आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन सामने जसप्रीत खेळला होता. गेल्या तीन महिन्यांत तो केवळ तीन सामने खेळला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने दोन विकेट्स घेतल्या, पण गेल्या दोन सामन्यांत तो खूप महागात पडला आहे. भारताच्या स्टार गोलंदाजाची ही कामगिरी आणि खराब फिटनेस ही संघासाठी मोठी चिंतेची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT