Jasprit Bumrah practices in nets in Vizag  
क्रीडा

बुम बुम बुमरा...नेटमध्ये भन्नाट मारा करू लागला 

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : भरवशाची वेगवान गोलंदाजी कमकूवत होत असताना टीम इंडियासाठी दिलासा देणारी घटना घडली आहे. भारतीय संघ चातकाप्रमाणे वाट पहात असलेला जसप्रित बुमारा पुनरागमनाच्या वाटेवर आहे. टीम इंडियासह आज त्याने नेटमध्ये सराव केला आणि रिषभ पंतला भन्नाट वेगात गोलंदाजी केली. 

प्रामुख्याने वेगवान गोलंदाज दुखापतीनंतर तुदुरुस्त होत असताना ते आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सज्ज झाले आहेत की नाही याची चाचणी संघाबरोबरच्या सरावात ट्रेनर निक वेब घेतात. विश्‍वकरंडक क्रिकेटनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला बुमरा चार महिन्यानंतर पूर्ण जोशात नेटमध्ये गोलंदाजी करू लागला आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची निवड अपेक्षित आहे. 

खेळाडूंची तंदुरुस्ती तपासण्याचे धोरण टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने बदलले आहे. त्यानुसार बुमारा आणि पृथ्वी शॉ भारतीय संघाच्या सरावात उपस्थित होते. बुमारला सरावाची जर्सी देण्यात आली. रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली यांनी सरावातून विश्रांती घेतली त्यामुळे नेटमध्ये सराव करणाऱ्या रिषभ पंत, मनिष पांडे आणि मयांक अगरवाल यांनी बुमराने पूर्ण जोशात गोलंदाजी केली. यावेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीचे सदस्य देबांग गांधी उपस्थित होते. बुमराचे काही वेगवान चेंडू पंत आणि अगरवालला खेळणे कठिण जात होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT