Jasprit Bumrah Recovery Update  esakal
क्रीडा

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहबाबत आली मोठी अपडेट; आयर्लंड मालिकेसाठी...

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah Recovery Update : भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक आज जाहीर झाले. यानंतर वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ कसा असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारताला गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराहची कमतरता चांगलीच जाणवली होती. त्यानंतर अजून बुमराहने भारतीय संघात पुनरागमन केलेले नाही. वनडे वर्ल्डकपसाठी तरी बुमराह फिट होणार का हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.

जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जसप्रीत बुमराह आता एनसीएमध्ये दिवसाला 7 षटके गोलंदाजी करतोय. बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो जवळपास एक वर्ष मैदानापासून दूर होता. आता तो आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत खेळणार अशी चर्चा सुरू होती. मात्र अजूनही जसप्रीत बुमराहच्या आयर्लंड मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

बुमराहचे पुनरागमन हे त्याच्या मॅच प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. बुमराहला आशिया कपसाठी फिट करणे हा बीसीसीआयचा आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार 'बुमराहला झालेल्या दुखापतीचे स्वरूप पाहता फिट होण्यासाठी कालमर्यादा घालणे योग्य ठरणार नाही. तुम्हाला कायम त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवावे लागणार आहे.'

'मात्र सांगण्यात येत आहे की बुमराह हा चांगला रिकव्हर होत आहे. तो एनसीएच्या नेट्समध्ये दिवसाला 7 षटके टकात आहे. त्याच्या वर्कलोडमध्ये देखील वाढ कऱण्यात आली आहे. तो एनसीएमध्ये पुढच्या महिन्यात सराव सामने देखील खेळणार आहे. त्यानंतर त्याच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवले जाईल.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT