Jasprit Bumrah still down with injury ruled out of Sri Lanka ODI 
क्रीडा

IND vs SL: असं काय झालं? बुमराहला 6 दिवसांपूर्वी संघात आला अन् अचानक गेला बाहेर

Kiran Mahanavar

IND vs SL ODI Series : भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 वनडे मालिका 10 जानेवारीपासून सुरू होत आहे. त्याआधीच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. क्रिकबझने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, बुमराहच्या मैदानात परतण्याची घाई होणार नाही. बुमराह मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी गुवाहाटीला पोहोचला नाही.(Jasprit Bumrah still down with injury ruled out of Sri Lanka ODI)

6 दिवसांपूर्वी वरिष्ठ निवड समितीने जसप्रीत बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या 3 वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात सामील करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बुमराहबाबत जारी केलेल्या निवेदनात बीसीसीआयने माहिती दिली होती की बुमराह सप्टेंबर 2022 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकातही दिसला नव्हता. यानंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन पूर्ण केले आणि त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आले. यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टीम इंडियाच्या संघात त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता हे समजण्यापलीकडचे आहे की जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असताना त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून वगळण्याचा निर्णय का घेण्यात आला किंवा तो अजिबात तंदुरुस्त नाही आणि बीसीसीआयने घाईघाईने त्याला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र वस्तुस्थिती काय आहे, हे कोणालाच माहीत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीए स्टाफच्या शिफारशीनंतर बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला वनडे मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी मालिका खेळायच्या आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्त्वाची आहे.

कारण या मालिकेतील भारताचा विजय-पराजय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग उघडेल किंवा बंद करेल. त्याचबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही औपचारिक वक्तव्य आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT