Jasprit Bumrah esakal
क्रीडा

टीम इंडियाला धक्का; Jasprit Bumrah वनडे सीरीजमधून आऊट

6 दिवसात नेमकं काय घडलं बुमराह सीरीजमधून आऊट

सकाळ डिजिटल टीम

Jasprit Bumrah to miss Sri Lanka ODIs श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. जसप्रीत बुमराहला आधी या मालिकेचा भाग बनवण्यात आले नव्हते, पण नंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. आता पुन्हा एकदा त्याला संघातून वगळण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराहला आधी वनडे सीरीजसाठी टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं. पण 3 जानेवारीला जसप्रीत बुमराहचा वनडे स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला. या निर्णयानंतर, अवघ्या 6 दिवसात तो बाहेर पडला.  गुवाहाटीमध्ये टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळायचा आहे.

15 मिनिटं धावलो की मलापण...; यो यो टेस्ट विरोधात गावसकरांनी उगारली बॅट

अवघ्या 6 दिवसात जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये खेळणार नसल्याच सांगण्यात आल्याने क्रिकेट जगतात चर्चेला उत आला आहे. बुमराह टीमच्या दुसऱ्या खेळाडूंसोबत गुवाहाटीमध्ये पोहोचलेला नाही. क्रिकबज अशी माहिती क्रिकबजने दिली आहे.

NCA ने जसप्रीत बुमराहला फिट घोषित केलं होतं

जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. पाठिच्या दुखण्यामुळे तो वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नाही. नॅशनल क्रिकेट अकादमीत त्याने आपल्या फिटनेसवर काम केलं. त्याला फिट घोषित करण्यात आलं.

IND vs SL: रोहितचे वाढले टेंशन! पंतच्या अनुपस्थितीत ODI मालिकेत कोण करणार विकेटकीपिंग

एनसीएने फिट घोषित केल्यानंतरच टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश केला. पण आता अचानक बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT