Jasprit Bumrah Trolled On Social Media Compare Australia Mitchell Starc esakal
क्रीडा

Jasprit Bumrah : स्टार्क.. IPL.. BBL वरून बुमराहला कानपिचक्या; #Starc होतोय ट्रेंड

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah Trolled : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत हुमराह पाठीच्या स्ट्रेच फ्रॅक्चरमुळे आगामी टी 20 वर्ल्डकपला मुकला आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ट्रेंड करत होता. काही नेटकऱ्यांनी यावरून जसप्रीत बुमराहला ट्रोल देखील करण्यास सुरूवात केली. नेटकऱ्यांचा रोख जसप्रीत बुमराह हा आयपीएल खेळताना कायम फिट असतो मात्र देशाकडून खेळताना तो कायम दुखापतग्रस्त असतो असा होता. (Australia Mitchell Starc Trending)

जसप्रीत बुमराहने भारताकडून यंदाच्या वर्षी प्रत्येक फॉरमॅटमध्ये 5 - 5 सामने खेळले आहेत. मात्र आयपीएलमध्ये पूर्ण 14 सामने खेळले होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा स्टार्कने महत्वाच्या स्पर्धेत फिट राहण्यासाठी आयपीएल आणि बीबीएल सारख्या पैसा कमवून देणाऱ्या स्पर्धांवर पाणी सोडले होते. याच गोष्टीवर बोट ठेवत नेटकरी आता जसप्रीत बुमराहला ट्रोल करत आहेत. बुमराहने आयपीएलला जास्त महत्व दिले. तर स्टार्कने याच्याविरूद्ध उदाहरण सर्वांसमोर ठेवले.

आशिया कपमधून देखील बुमराहने पाठ दुखीच्या कारणामुळे माघार घेतली होती. यापूर्वी तो इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाकडून खेळताना दिला होता. आशिया कपनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत तो संघात परतला होता. यापैकी तो दोन सामने खेळला. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिकेला तो पाठ दुखीमुळे मुकला. पहिल्यांदा त्याची दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. मात्र पुढे त्याची दुखापत गंभीर असल्याचे आढळून आल्याने तो टी 20 वर्ल्डकपला देखील मुकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि करू नये? जाणून घ्या नियम

Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत

Shubhanshu Shukla : अवकाशात खूप भिती वाटते, पण....गगनयान मिशनबद्दल काय बोलले अंतराळवीर शुभांशू शुक्ला? पाहा व्हिडिओ.

Maharashtra Latest News Live Update : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा प्रभागरचना आराखडा फेटाळला; मंत्रालयीन दुरुस्तीनंतर पुन्हा सादर

SCROLL FOR NEXT