Javelin Thrower Neeraj Chopra Says aiming for Bigger Than This After Broking Own National Record  esakal
क्रीडा

'भन्नाट' कामगिरीनंतर नीरज म्हणाला यापेक्षाही मोठ्या स्पर्धांवर माझे लक्ष!

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने पावो नुरमी गेम्समध्ये नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरणाऱ्या नीरजने 89.30 मीटर भालाफेक केली. त्याने फिनलँडमधील या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. फिनलँडच्याच ओलिव्हर हेलेंडरने 89.83 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावले. (Javelin Thrower Neeraj Chopra Says aiming for Bigger Than This After Broking Own National Record)

नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला 'टोकियो ऑलिम्पिकनंतर ही माझी पहिलीच स्पर्धा होती. मी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. मी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला याचबरोबर रौप्य पदक देखील पटकावले. आता मी याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यात राष्ट्रकुल स्पर्धांचा देखील समावेश आहे. तेथे मला तगडे आव्हान मिळणार आहे.'

नीरज चोप्राचे यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम हा 88.07 मीटर भालाफेक करण्याचा होता. हा राष्ट्रीय विक्रम त्याने पटियालामध्ये गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात प्रस्थापित केला होता. यानंतर काही महिन्यांपूर्वी 7 ऑगस्ट 2021 मध्ये टोकियोत 87.58 मीटर भालाफेक करत ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावले होते.

त्यानंतर आता पावो नुरमी गेम्समध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात निरजने 86.92 मीटर लांब भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 89.30 मीटर भाला फेकून आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. 24 वर्षाच्या निरजचे पुढचे तीनही प्रयत्न फाऊल ठरले. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरजने 85.85 मीटर भाला फेकला. नीरज म्हणाला की या स्पर्धेमुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता या स्पर्धेत ज्या काही उणिवा राहिल्या आहेत त्यात सुधारणा करायची आहे.

तो म्हणाला 'मी या स्पर्धेत चांगली सुरूवात केली आहे. यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. मी अजून चांगली कामगिरी करू शकतो असे वाटते. या स्पर्धेतील शिकवण घेऊन त्यात सुधारणा करणार आहे. आता याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धांचे आव्हान आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT