jay shah gave a update Rohit Sharma-will be the captain of India in T20 World Cup 2024 
क्रीडा

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचा कर्णधार कोण? BCCI सचिव जय शाहांनी दिली मोठी अपडेट

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. भारताने फायनलआधी एकही सामना गमावला नव्हता, मात्र एक खराब दिवस आणि टीम इंडियाचे तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या कर्णधाराचे खूप कौतुक झाले.

बीसीसीआयने अलीकडेच वर्ल्ड कप अंतिम पराभवाचा आढावा घेतला आणि पुढील योजनांवर विचार केला. मात्र, आगामी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही.


रोहित शर्मा 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव सध्या टी-20 संघाचे नेतृत्व करत आहे. BCCI सचिव जय शाह यांनी WPL लिलावादरम्यान भारताच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 कर्णधाराबाबत एक मोठे अपडेट दिले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी मुंबईत डब्ल्यूपीएल लिलावाच्या वेळी सांगितले, 'वर्ल्ड कप जूनमध्ये सुरू होत आहे, त्याआधी आमच्याकडे आयपीएल आणि अफगाणिस्तानविरुद्धची मालिका (जानेवारीमध्ये) आहे. आम्ही चांगला निर्णय घेऊ.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टी-20 संघाची धुरा सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याच्या फिटनेस अपडेटबाबत तो म्हणाला, आम्ही त्याच्यावर लक्ष्य ठवले आहे. तो NCA मध्ये आहे आणि खूप मेहनत करत आहे. अफगाणिस्तान मालिकेपूर्वीही तो फिट होऊ शकतो.

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती घेतली आहे.

या दौऱ्यात टीम इंडिया तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. टी-20 ची कमान सूर्यकुमार यादवकडे आहे, तर एकदिवसीय केएल राहुल आणि कसोटीत रोहित शर्मा कर्णधार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT