Jay Shah BCCI President BCCI Annual General Meeting esakal
क्रीडा

BCCI Election : 18 ऑक्टोबर; जय शहांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरली?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ची बहुप्रतिक्षित वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI Annual General Meeting) ही 18 ऑक्टोबरला होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याचवेळी बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि सचिव पदाची निवडणूक (BCCI Election) देखील होण्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 'जरी अजून अधिकृत सुचना मिळालेली नसली तरी बीसीसीआयमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज्य संघटनांच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की येत्या 18 ऑक्टोबरला मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक देखील होणार आहे.' ही माहिती सूत्रांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या कूलिंग ऑफ कालावधीविषयक नियमांमध्ये सुधारणा करण्यास परवानगी दिल्यानंतर आता जय शहा बीसीसीआयचे अध्यक्ष (Jay Shah BCCI President) होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सौरभ गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे तर जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत.

कोरोना काळात आयपीएलचे यशस्वी आयोजन आणि प्रसारण हक्क प्रक्रियेतून मिळवलेला बक्कळ महसूल यामुळे जय शहा यांना अनेक राज्य संघटनांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, सौरभ गांगुली हा आयसीसीच्या चेअरमन पदासाठी आपली दावेदारी सादर करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनची निवडणूक देखील याच दिवशी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT