Jay Shah May Be The Next BCCI President 15 State Association Back Him
Jay Shah May Be The Next BCCI President 15 State Association Back Him ESAKAL
क्रीडा

Jay Shah : गांगुलीचा पत्ता कट, आता जय शहा होणार BCCI अध्यक्ष?

अनिरुद्ध संकपाळ

Jay Shah Sourav Ganguly BCCI : सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या घटनेत दुरूस्ती करण्याची परवानगी दिली. त्यानंतर BCCI अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ अजून एक टर्म वाढवून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 2019 मध्ये भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा सचिव झाले होते. (Jay Shah May Be The Next BCCI President 15 State Association Back Him)

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बीसीसीआयमध्ये निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. बीसीसीआय लवकरच आपली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य संघटनांमध्ये नव्याने निवडणुकांसाठी नोटीस काढण्यात येईल. बीसीसीआयचे सध्याचे अखिदारी या महिन्यात आपला 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुका होतील.

जय शहा होणार बीसीसीआयचे अध्यक्ष?

सध्याचे बीसीसीआय सचिव जय शहा हे 34 वर्षांचे आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार 15 राज्य संघटना जय शहा यांना बीसीसीआयचा नवा अध्यक्ष करण्यासाठी सहमत आहेत. अनेक सदस्यांचे म्हणणे आहे की कोरोना काळात देखील आयपीएलचा हंगाम आयोजित करण्यामध्ये जय शहा यांचा मोठा वाटा आहे. याचबरोबर आयपीएलच्या माध्यम प्रसारण हक्कातून बीसीसीआयला 48 हजार 390 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एका राज्य संघटनेच्या सदस्याने सांगितले की, 'जय शहांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद हातात घेण्याची ही योग्य वेळ आहे. सर्व राज्य संघटना त्यांना समर्थन देण्यास तयार आहेत.' मात्र जर जय शहा बीसीसीआय अध्यक्ष झाले तर मग सौरभ गांगुली काय करणार? एनडीटीव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार सौरभ गांगुली आयसीसीच्या चेअरमन पदासाठी आपले दावेदारी सादर करण्याची शक्यता आहे. क्रेग बार्कले यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे आयसीसीच्या चेअरमनपदासाठी देखील लवकरच निवडणूक लागू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT