Jhye Richardson Celebrate Perth Scorchers 4th BBL Championship with bleeding Nose
Jhye Richardson Celebrate Perth Scorchers 4th BBL Championship with bleeding Nose  esakal
क्रीडा

Video: BBL विजेतेपदाचे 'रक्ताने माखलेले' सेलिब्रेशन

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न: ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगची (Big Bash League) फायनल नुकतीच मेलबर्नमधील डॉकलँड क्रिकेट स्टेडियमवर पार पडली. पर्थ स्कॉचर्सने (Perth Scorchers) सिडनी सिक्सर्सचा (Sydney Sixers) तब्बल ७९ धावांनी पराभव करत आपल्या चौथ्या विजेतेपदाला गवसणी घातली. पर्थ स्कॉचर्सने सिडनी सिक्सर्स समोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचा संपूर्ण संघ १६.२ षटकात ९२ धावाच पॅव्हेलियनमध्ये पोहचला.

दरम्यान, पर्थ स्कॉचर्सने आपल्या चौथ्या बीबीएल (BBL) विजेतेपद जल्लोषात (Perth Scorchers 4th BBL Championship Celebration) साजरे करण्यास सुरूवात केली. सर्व खेळाडू उत्तेजित झाले होते. याच दरम्यान, पर्थ स्कॉचर्सचा स्टार गोलंदाज जे रिचर्डसन सोबत (Jhye Richardson) एक दुर्घटना घडली. विजय साजरा करत असताना त्याच्या नाकाला एका संघ सहकाऱ्याचा खांदा लागला. त्यामुळे त्याच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला होता. मात्र विजयाच्या धुंदीत त्याने याकडे साफ दुर्लक्ष केले. तो या रक्ताने माखलेले नाक घेऊनच समालोचकाला प्रतिक्रिया देत होता.

रिचर्डसन प्रतिक्रिया देताना समालोचकाने त्याला या दुर्घटनेबाबत विचारले त्यावेळी त्याने 'हे खूप गंमतीशीर आहेत. माझ्या एका संघ सहकाऱ्याचा खांदा सेलिब्रेशन करत असताना माझ्या नाकाला लागला.' रिचर्डसनच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद इतका ओसंडून वाहत होता की त्याच्या नाकातून रक्त (bleeding Nose) वाहत येत तोंडात जात होते मात्र रिचर्डसन आनंदाने हसत होता. रिचर्डसनने फायनलमध्ये दमदार गोलंदाजी केली होती. त्याने ३.२ षटके टाकत फक्त २० धावात सिडनी सिक्सर्सच्या २ विकेट घेतल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

SCROLL FOR NEXT