Joe Root Jonny Bairstow Century England Defeat India In 5th Test Series Equals esakal
क्रीडा

ENG vs IND : रूट - बेअरस्टोच्या जोरावर इंग्लंडने रचला इतिहास

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहम : इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारताचा सात गडी राखून पारभव करत पाच कसोटी सामन्यांची मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली. भारताने पाचव्या कसोटीत विजयासाठी ठेवलेल्या 378 धावांचा 3 फलंदाजांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला.

इंग्लंडने यापूर्वी चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2019 मध्ये 359 धावांचा पाठलाग केला होता. तो विक्रम आज इंग्लंडने मोडला. इंग्लंडकडून जो रूटने (Joe Root) दमदार शतक (142) ठोकले. त्याला साथ देणाऱ्या जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) (114) देखील सलग दुसऱ्या डावात शतकी खेळी करत इंग्लंडच्या विजयाचा मोठा वाटा उचलला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 269 धावांची भागीदारी रचली.

भारताकडून ऋषभ पंतने (Rishabh Pant) पहिल्या डावात 146 आणि दुसऱ्या डावात 57 धावांची खेळी केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात ऋषभ पंतच्या 146 आणि रविंद्र जडेजाने केलेल्या 104 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 416 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 284 धावात गुंडाळला. यात जॉनी बेअरस्टोने 106 धावांचे योगदान दिले होते. तर भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताला 245 धावाच करता आल्या. भारताकडून चेतेश्वर पुजाराने 66 तर ऋषभ पंतने 57 धावांची खेळी केली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्राऊली आणि अॅलेक्स लीज यांनी शतकी सलामी दिली लीजने 56 तर काऊलीने 46 धावा केल्या.

यानंतर जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पाठोपाठ दोन धक्के दिले. ऑली पोप देखील शुन्यावर धावबाद झाला होता. मात्र त्यानंतर जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 269 च्या पार भागीदारी रचली. रूटने आपले 28 वे कसोटी शतक ठोकले तर बेअरस्टोने सामन्यातील दुसऱ्या डावातही शतक ठोकून भारताच्या पारड्यातील विजय इंग्लंडच्या पारड्यात टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup: महिला विश्वविजेत्यांचा ‘डायमंड’ सन्मान! हिरे आणि सौर उर्जेची दुहेरी भेट; उद्योगपती आणि खासदारांकडून खास गिफ्ट

DAYA DONGRE DIED: एका युगाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन; प्रेक्षकांची खट्याळ सासू हरपली

Dhule News : गुलाबी थंडीची वाट, पण 'पर्जन्यराजा' थांबायला तयार नाही! धुळ्यात नोव्हेंबरमध्येही पावसाळी वातावरण, नागरिक हैराण

Women's World Cup: भारतीय खेळाडूच्या आजीला आलेला हार्टअॅटॅक, पण वर्ल्ड कपसाठी कुटुंबाने घेतलेला मोठा निर्णय

Mumbai News: मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल; स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमात मानाचा तुरा

SCROLL FOR NEXT