Sanju Samson KL Rahul esakal
क्रीडा

Sanju Samson KL Rahul : केएल राहुलवर ट्विट करणाऱ्या पत्रकाराला शशी थरूरांना संजू सॅमसनची करून दिली आठवण

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson KL Rahul : भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार केएल राहुलला मिळणाऱ्या संधींबाबत अनेक आजी माजी क्रिकेटपटू बोलत आहेत. भारतातील वरिष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी देखील याबाबत ट्विट केले होते. मात्र या ट्विटवर खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देताना भारताचा विकेटकिपर फलंदाज आणि सातत्याने संघात आत बाहेर होणाऱ्या संजू सॅमसनच्या विषयाला वाचा फोडली.

शशी थरूर यांनी शेखर गुप्तांच्या केएल राहुलबद्दल केलेल्या ट्विटला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'आणि संजू सॅमसन बाबत काय? वनडेमध्ये 76 ची सरासरी तरी देखील त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेतून त्याला वगळले. तुम्हाला कामगिरी न करणाऱ्यांना दीर्घकाळ संधी देणे योग्य आहे. मात्र गुणवान कामगिरी करण्याऱ्यांवर खर्च करणे जमत नाही?'

शशी थरूर हे संजू सॅमसनचे जाहीररित्या समर्थन करत असताता. काँग्रेसचे खासदार केरळच्या या विकेटकिपर फलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी ट्विटरवर चांगलेच सक्रीय असतात. संजू सॅमसन हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र त्याचे संघातील स्थान अजून पक्के झालेले नाही. तो संघात आत - बाहेर करतोय.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT