junior asia cup triumph odisha trio helps india conquer pakistan dilip tirkey announces cash award for players
junior asia cup triumph odisha trio helps india conquer pakistan dilip tirkey announces cash award for players sakal
क्रीडा

विजेत्या हॉकीपटूंना प्रत्येकी दोन लाख; आशिया कप जिंकून भारतीय संघ ज्युनियर वर्ल्डकपसाठी पात्र

सकाळ वृत्तसेवा

ओमान : आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सर्वाधिक चार वेळा जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला. त्याचबरोबर मलेशियात होणाऱ्या ज्युनियर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी पात्रताही मिळवली. या शानदार यशाचे कौतुक हॉकी इंडियाने केले असून संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी दोन लाख, तर सपोर्ट स्टाफला प्रत्येक १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

माजी खेळाडू आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी विजेत्या संघाला शाबासकी दिली आहे. या स्पर्धेत केलेली अपराजित कामगिरी अभिमानास्पद आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही फारच चांगला प्रगती करणारा खेळ केला आहे. सुलतान ऑफ जोहार कप या स्पर्धेपासून खेळ उंचावत नेला आहे. या विजेतेपदामुळे ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेसाठी आत्मविश्वास उंचावला आहे, असे तिर्की यांनी म्हटले आहे.

या आशिया स्पर्धेत प्रत्येक सामन्यात आपल्या संघाने जबरदस्त खेळ केला. ज्युनियर आशिया कप स्पर्धेत आपण नेहमीच वर्चस्व राखले आहे. २१ वर्षांखालील मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण धोरणाचा हा भाग आहे, असे ‘हॉकी इंडिया’चे सचिव भोलानाथ सिंग यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले.

पाकविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने मध्यांतरापर्यंत २-० आघाडी घेऊन वर्चस्व मिळवले होते; परंतु तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये पाकने एक गोल केला आणि त्यानंतर सातत्याने भारतीय गोलक्षेत्रात आक्रमण केले. या दरम्यान त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळत होते; परंतु भारतीय गोलरक्षकाने अभेद्य कामगिरी करून पाकचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

अंतिम क्षणी कमालीचा संघर्ष झालेल्या या सामन्याबाबत बोलताना भारतीय कर्णधार उत्तम सिंग म्हणाला, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हा सामना जिंकायचा होता. साखळी सामन्यात पाकने आम्हाला १-१ अशा बरोबरीत रोखले होते. त्यामुळे आम्हाला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करावी लागणार आहे याचा अंदाज आला होता.

अंतिम सामन्याबाबत काहीसे दडपण होते, कारण संघातील बहुतेक खेळाडू एवढ्या मोठ्या प्रेक्षकांसमोर कधीच खेळले नव्हते. मात्र सुरुवातीलाच गोल केल्यामुळे दडपण दूर होत गेले आणि सामन्यावर नियंत्रण मिळवता आले, असेही उत्तम सिंग म्हणाला.

भारतीय संघाचे प्रशिक्षक सीआर कुमार यांनी यशाचे श्रेय सांघिक प्रयत्नांना दिले. प्रत्येकाने मिळालेली संधी गमावली नाही. तरीही आमच्याकडून अजून गोल व्हायला हवे होते. पाकिस्तानविरुद्ध खेळताना दडपण तर असणारच; परंतु आमच्या खेळाडूंनी भावनांवर आवर घालत आपल्या क्षमतेनुसार खेळ केला, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT