jyoti surekha priyansh esakal
क्रीडा

Archery World Cup : आर्चरी वर्ल्डकपमध्ये ज्योती सुरेखा-प्रियांशने भारताचे आणखी एक पदक केले निश्चित

अनिरुद्ध संकपाळ

Archery World Cup Stage 2 : ज्योती सुरेखा आणि प्रियांश यांनी मिश्र दुहेरीत अंतिम फेरी गाठून विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे दुसरे पदक निश्चित केले. तसेच दीपिका कुमारीने रिकर्व्ह प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश करून आपली वाटचाल कायम ठेवली.

या विश्वकरंडक स्टेज-२ स्पर्धेत ज्योती, परनीत आणि आदिती स्वामी यांनी महिलांच्या सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी अगोदरच गाठलेली आहे. त्यांचे पदक निश्चित आहे. अंतिम सामना उद्या होणार आहे. रिकर्व्हच्या प्रकारात पुरुषांमध्ये प्रथमेश फुगे याने उपांत्य फेरी गाठून पदकाची आशा कायम ठेवली आहे.

आज झालेल्या मिश्र दुहेरी स्पर्धेत ज्योती आणि प्रियांश ही जोडी जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्यांनी १६ बाणांच्या स्पर्धेत केवळ दोनच गुण गमावले आणि दक्षिण कोरियाच्या हान सेनग्योन आणि यांग जेवॉन यांचा १५८-१५७ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना अमेरिकेच्या ओलिविया डिन आणि सवयेर सुलिवान यांच्याशी होईल.

अमेरिकेची ही जोडी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. ज्योती आणि प्रियांश यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामच्या जोडीवर १५९-१५२ अशी सहज मात केली होती.

डिसेंबर २०२२ मध्ये आई झाल्यानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय तिरंदाजीत परतणाऱ्या दीपिकाने सलग दुसऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र उपांत्य फेरीत तिला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या लिम सिह्योन हिचा सामना करावा लागणार आहे.

महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात भजन कौरचा पहिल्या फेरीतच पराभव झाला, तर अंकिता भाकतला दुसरी फेरी पार करता आली नाही. पुरुषांमध्ये अनुभवी तरुणदीप राय आणि म्रिनल चौहन यांनाही पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला, तर तर धीरज बोमादेवर्मा आणि प्रवीण जाधवही दुसरी फेरी पार करू शकले नाहीत.

रिकर्व्हच्या मिश्र दुहेरीत दीपिका आणि तरुणदीप राय यांचा एकत्रित अनुभव ३४ वर्षांचा आहे. त्यांनाही रिकाम्या हाती परतावे लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे त्यांना मजल मारता आली नाही.

(Cricket News Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

Nashik Crime : नाशिक हादरले! ४०० कोटींच्या नोटांचा कंटेनर लुटल्याप्रकरणी आता 'एसआयटी' चौकशी

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सिझनवर प्रेक्षक व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT