Rishabh Pant Accident Kapil Dev  esakal
क्रीडा

Rishabh Pant Accident : तुमच्याकडे पॉश गाडी आहे, तो तुमचा छंदही असेल मात्र... पंतच्या अपघातावर कपिल देव बोलले

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Accident Kapil Dev : भारताचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंतचा 30 डिसेंबरच्या रात्री भीषण अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ पंतची पॉश मर्सिडीस जळून खाक झाली होती. पंत या अपघातातून थोडक्यात बचावला. त्याच्या डोक्याला, गुडघ्याला आणि पाठीला देखील दुखापत झाली आहे. पंत काही बस चालकांच्या मदतीमुळे गाडी पेट घेण्यापूर्वीच बाहेर आला होता. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी पंतच्या अपघातानंतर युवा क्रिकेटपटूंना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

ऋषभ पंतच्या अपघातावर कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघातील युवा क्रिकेटपटूंना सल्ला दिला आहे. कपिल देव म्हणाले की भारतीय संघातील टॉपचे क्रिकेटपटू आपल्या गाडीवर सहज चालक ठेवू शकतात. त्यानी कायम आपल्यासोबत एक चालक घेऊनच प्रवास केला पाहिजे.

कपिल देव यांनी याबाबत आपले उदाहरण देखील दिले. ते म्हणाले की, 'ज्यावेळी मी एक युवा क्रिकेटपटू होतो त्यावेळी माझा मोटरसायकलवरून जाताना अपघात झाला होता. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या भावाने मला मोटरबाईकला हात देखील लावू दिला नाही. ऋषभ पंत बरा आहे हे ऐकून बरे वाटले.'

कपिल देव पुढे म्हणाले की, 'तुमच्याकडे चांगल्या दिसणाऱ्या चांगला वेग असलेल्या पॉश गाड्या आहेत. मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही सहजरित्या गाडीवर चालक ठेवू शकतो तुम्हाला ते आरामात परवडतेही. तुम्ही एकट्याने प्रवास करणे टाळले पाहिजे.'

'कुणाला चांगल्या चांगल्या गाड्यांची आवड असते हे मी समजू शकतो. या वयात अशी आवड असणे नैसर्गिक आहे. मात्र तुमच्यावर काही जबाबदारी देखील आहे. तुम्हीच स्वतःची उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकता. तुम्ही तुमच्यासाठी काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत.' (Sports Latest News)

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पंतच्या कपाळावर दोन ठिकणी कट पडले आहेत. त्याच्या उजव्या गडघ्याचे लिगामेंट टिअर झाले आहेत. अनेक ठिकाणी त्याच्या भाजले देखील आहे. याचबरोबर काही छोट्या दुखापती देखील झाल्या आहेत. 25 वर्षाच्या ऋषभची प्रकृती स्थीर असून त्याला आता अतिदक्षता विभागातून खासगी रूममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT