Neeraj Chopra And Kapil Dev E sakal
क्रीडा

गोल्डन बॉय लग्नाचं कसं? कपिल पाजींचा 'यॉर्कर'

लहानपणी कोणी लठ्ठ म्हणून बोलवायचे तर पांढरा कुर्ता घातल्यानंतर काहीजण सरपंच म्हणायचे, असा किस्साही नीरजने शेअर केला.

सुशांत जाधव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिवंगत फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांची स्वप्नपूर्ती करत नीरज चोप्राने नवा इतिहास रचला. 121 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला गोल्ड मेडल मिळाले. टोकियोतील सुवर्णमयी कामगिरीनंतर नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यानंतर आता नीरज चोप्राची एक विशेष मुलाखत चर्चेत आहे. जपानमधील टोकियोत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनी नीरजची खास मुलाखत घेतलीये. या मुलाखतीमध्ये नीरजने दिलखुलास गप्पा मारल्या.

कपिल पाजींनी खास अंदाजात मुलाखतीला सुरुवात केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील तू इतिहास रचलास. या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशातील आई-वडील आपल्या मुलाला डॉक्टर-इंजिनिअर नाही तर नीरजसारखे बनवण्याचा विचार करतील, अशा शब्दांत कपिल पाजींनी नीरजचे यश देशातील पालकांची खेळाबद्दलची मानसिकता बदलणारी असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

नीरजनेही कपिल पाजींच्या ऐतिहासिक कामगिरीचा दाखला देत तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडून आम्हाला प्रेरणा मिळाल्याचे म्हटले. मेहनतीच्या जोरावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्याचा निश्चय केला होता. आम्ही तुमच्याकडून काही गोष्टी शिकलो आता पुढच्या पीढीने आमच्याकडून काहीतरी शिकावे, हे रिंगण असेच सुरु रहावे, अशी भावना नीरजने व्यक्त केली.

कारकिर्दीची सुरुवात कशी झाली? भालाफेकसारख्या खेळामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन कोणी दिले? यासारख्या प्रश्नासह उद्या लग्नाचा दबाव आला तर काय निर्णय घेशील? असा प्रश्न कपिल पाजींनी नीरजला विचारला. यावर तो म्हणाला की, वेळ येईल सध्याच्या घडीला सर्व फोकस हा खेळावर आहे. वेळ येईल त्यावेळी लग्नही होईल, असे उत्तर नीरजने दिले. कपिल पाजींसोबतच्या मुलाखतीमध्ये त्याने बालपणीच्या काही खास आठवणींही सांगितल्या. लहानपणी कोणी लठ्ठ म्हणून बोलवायचे तर पांढरा कुर्ता घातल्यानंतर काहीजण सरपंच म्हणायचे, असा किस्साही नीरजने शेअर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT