नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक झळकावलेले नाही. त्याच्या बॅटमधून काधी काळी शतकांचा पाऊस पडायचा. मात्र आता त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. धावांच्या दुष्काळातून जात असेलल्या विराट कोहलीवर भारतातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीकेची झोड उठवली होती. त्यात भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा नंबर पहिला होता. त्यांनी विराट कोहलीला देखील संघातून डच्चू मिळू शकतो असे वक्तव्य केले होते. मात्र आता त्यांनी थोडी नरमाईची भुमिका घेतल्याचे दिसते.
कपिल देव म्हणाले की, 'भारत गेल्या पाच - सहा वर्षात विराट कोहलीशिवाय खेळलेलाच नाही असं नाही. पण, चांगल्या दर्जाचा हा खेळाडू आता फॉर्ममध्ये आला पाहिजे. होय त्याला वगळण्यात आले आहे किंवा विश्रांती देण्यात आली आहे. पण, त्याच्यामधील क्रिकेट अजून बाकी आहे. मात्र विराट कोहलीला फॉर्ममध्ये (Virat Kohli Form) परतण्याचा मार्ग शोधावाच लागले.'
कपिल देव पुढे म्हणाले की, 'तुम्ही परत रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळावे किंवा दुसरीकडे खेळावे आणि धावा कराव्यात. त्याचा आत्मविश्वास परत येणे खूप गरजेचे आहे. हाच तर ग्रेट आणि चांगल्या खेळाडूमधील फरक असतो. त्याच्यासारखा ग्रेट खेळाडू फॉर्ममध्ये परत येण्यास फार वेळ लावत नाही. त्याला स्वतःशीच लढावे लागेल आणि गोष्टी पूर्वपदावर आणाव्या लागतील.'
विराट कोहलीला विंडीज दौऱ्यासाठी वगळण्यात आले आहे की विश्रांती देण्यात आली आहे याबाबत कपिल देव म्हणाले की, 'विराट कोहली सारख्या मोठ्या खेळाडूला वगळण्यात आले आहे असं मी म्हणणार नाही. तो खूप मोठा खेळाडू आहे. तुम्ही त्याला आदर देत म्हणाला की त्याला विश्रांती देण्यात आली आहे याने कोणाचे नुकसान होणार नाही.'
देव पुढे म्हणाले की, 'सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की विराट कोहली आपला फॉर्म कशाप्रकारे परत आणू शकतो? तो काही सामन्य क्रिकेटर नाही. त्याने अधिक सराव आणि अधिक सामने खेळले पाहिजेत. टी 20 क्रिकेटमध्ये माझ्या दृष्टीकोणातून विराट कोहलीपेक्षा मोठा खेळाडू दुसरा कोणता नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही लौकिकास साजेशी कामगिरी करत नाही निवड समिती त्यांचा निर्णय घेऊ शकते. माझ्या मते कोणीही साजेशी कामगिरी करत नसेल तर त्याला वगळण्यात यावे किंवा विश्रांती देण्यात यावी.'
विराट कोहली फॉर्ममध्ये येण्याची क्रिकेट जगत आतूरतेने वाट पाहत आहे. याबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले की, 'विराट कोहली फॉर्ममध्ये येण्यासाठी इतका वेळ लावतोय ही काळजीची बाब आहे. ग्रेट खेळाडू इतका वेळ घेत नाहीत. मला त्याला वगळणे किंवा विश्रांती देण्याबाबत कोणतीच तक्रार नाही. मला तो लवकरात लवकर फॉर्ममध्ये आलेला हवा आहे. ग्रेट खेळाडूंसाठी त्यांचे नशिब पलटवण्यासाठी एक चांगली इनिंग बस असते. मात्र ही एक इनिंग कधी येईल हे माहिती नसते.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.