Kapil Dev Says If You Feel Pressure Don't Play IPL During Program esakal
क्रीडा

Kapil Dev | VIDEO : दबाव आहे तर IPL खेळू नका; कपिल देव यांनी 'स्ट्रेट ड्राईव्ह'च मारला!

अनिरुद्ध संकपाळ

Kapil Dev Statement Over IPL Pressure : भारताचे दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या खेळाडूंवर कडक शब्दात टीका केली आहे. जेव्हापासून टी 20 क्रिकेटचा उदय झाला आहे तेव्हापासून क्रिकेट खूपच दमछाक करणारे झाले आहे. अनेक खेळाडू तीनही क्रिकेट फॉरमॅट खेळत असल्याने त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक ताण वाढला आहे. याचबाबत कपिल देव यांनी आपले सडेतोड मत व्यक्त केले.

कपिल देव चॅम्पियन्स ऑफ आकाश 2022 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. हा कार्यक्रम आकाश बायजू या शैक्षणिक संस्थेने आयोजित केला होता. यावेळी कपिल देव सध्याचे स्पर्धात्मक जग आणि त्यांचे खेळत असतानाचे जुने दिवस यांची तुलना केली.

कपिल देव म्हणाले की, 'माझी खेळण्याची तीव्र इच्छा होती. हा महत्वाचा फरक होता. मी जरा विषय बदलतोय. मी सध्या टीव्हीवर सातत्याने ऐकतोय, लोक म्हणत आहेत की आमच्यावर खूप दबाव आहे. आम्ही आयपीएल खेळत आहोत. तेथे खूप दबाव असतो. यावर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो खेळू नका! दबाव काय असतो जर तुम्हाला खेळण्याची तीव्र इच्छा असेल तर तेथे दबाव असूच शकत नाही.'

कपिल देव पुढे म्हणाले की, 'दबाव, डिप्रेशन हे अमेरिकेतून आलेले शब्द आहेत. मला हे कधी समजलेच नाहीत. मी शेतकरी कुटुंबातून येतो. आम्ही आनंदासाठी खेळलो. जिथे आनंद आहे तिथे दबाव असूच शकत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT