Karnataka Hijab Row Football Player Paul Pogba Instagram Story  esakal
क्रीडा

Hijab Row: स्टार फुटबॉलर पोग्बाची हिजाब वादात उडी

अनिरुद्ध संकपाळ

कर्नाटकात सुरू झालेले हिजाब प्रकरण (Karnataka Hijab Row) आता देश पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचले आहे. 4 फेब्रुवारीपासून उडपीतील कॉलेजमधील मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्यावरून वाद पेटलाय. या वादात आता मँचेस्टर युनायडेचा स्टार फुटबॉलपटू पॉल पॉग्बो (Paul Pogba) याने देखील उडी घेतली आहे. त्याने या आंदोलनाबाबतची इन्स्टाग्राम स्टोरी (Instagram Story) ठेवली आहे. (Karnataka Hijab Row Football Player Paul Pogba Instagram Story)

फ्रेंच फुटबॉलर पोग्बाने हिजाब वादावरून भारतात सुरू असलेल्या एका आंदोलनाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टा स्टोरीवर लावला आहे. त्या व्हिडिओ सोबतच 'भारतात हिंदूत्ववादी एक गट हिजाब घातलेल्या एका मुस्लिम मुलींचा छळ करणे सुरूच आहे.' असा मजकूर देखील लिहिला आहे.

Karnataka Hijab Row Football Player Paul Pogba Instagram Story

दरम्यान, हिजाब वादावून (Hijab Row) सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील डीसीटीईच्या (Department of Collegiate and Technical Education) अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यापीठांना 9 फेब्रुवारीपासून तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर कर्नाटक उच्च न्यायालयाने जोपर्यंत हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात लोकांच्या भावना भडकवणारे कपडे न घालण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT