Khaleel Ahmed Record in IPL  esakal
क्रीडा

Khaleel Ahmed Record in IPL : मेयर्सचा कॅच सोडून खलनायक ठरलेल्या खलील अहमदने केले ढासू रेकॉर्ड

अनिरुद्ध संकपाळ

Khaleel Ahmed Record in IPL : आयपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनौकडून पदार्पण करणाऱ्या कायल मेयर्सने 73 धावांची तुफानी खेळी केली होती. त्याला 14 धावांवर खलील अहमदने जीवन दान दिले. मात्र जरी खलील हा सामन्याचा खलनायक ठरला असला तरी त्याने त्याच सामन्यात एक दमदार विक्रम देखील केला.

खलील अहमद आता आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान 50 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने फक्त 35 सामन्यात 50 आयपीएल विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अमित मिश्रा, मोहित शर्मा, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि आरपी सिंह यासारख्या गोलंदाजांना मागे टाकले.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 50 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

खलील अहमद - 35 सामने

अमित मिश्रा - 37 सामने

मोहित शर्मा - 39 सामने

युझवेंद्र चहल - 40 सामने

संदीप शर्मा - 40 सामने

आरपी सिंह - 40 सामने

खलील हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 50 विकेट्स घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. तर तो सर्वात वेगवान 50 विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. आयपीएल इतिहासात सर्वात वेगाने 50 विकेट्स घेण्याचा विक्रम हा कसिगो रबाडाच्या नावावर आहे. त्याने फक्त 27 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या आहेत. तर सुनिल नरेनने 32 सामन्यात, लसिथ मलिंगाने 33 तर इमरान ताहिरने 35 सामन्यात 50 विकेट्स घेण्याचा कारनामा केला.

आयपीएलमध्ये सर्वात वेगाने 50 विकेट्स घेणारे गोलंदाज

कसिगो रबाडा - 27 सामने

सुनिल नरेन - 32 सामने

लसिथ मलिंग - 33 सामने

इमरान ताहिर - 35 सामने

खलील अहमद - 35 सामने

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर लखनौ सुपर जायंट्सच्या विजयात कायल मेयर्सच्या 73 धावांचे आणि मार्क वूडच्या 14 धावात घेतलेल्या 5 विकेट्सचा मोठा वाटा होता. लखनौ आयपीएलमधील आपल्या होम ग्राऊंडवरील पहिला सामना खेळत होता. त्याने होम ग्राऊंडवरील आपले अभियान विजयाने सुरू केले. याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनौने विजयाची हॅट्ट्रिक देखील लगावली.

(Sports Latest News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT