BWF World Championships lakshya sen and kidambi srikanth  Sakal
क्रीडा

BWF World Championships : श्रीकांत-लक्ष्यचं पदक पक्के

ताईगिरीसमोर सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा, सलग पाचव्यांदा स्विकारावा लागला पराभव

सुशांत जाधव

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दोन पदक निश्चित झाली आहेत. शुक्रवारी स्पेनच्या हुलेवा येथे झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन या दोघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पुरुष एकेरीत या जोडीनं डबल धमाकाच करुन दाखवलाय. श्रीकांतने नँदरलंड्सच्या मार्क कालजाऊ याला 26 मिनिटांच्या लढतीत 21-8, 21-7 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसरीकडे लक्ष्य सेन याने चीनच्या जुन पेंग झाऊ याला 21-15, 15-21, 22-20 अशी मात देत पुढची फेरी गाठली. शनिवारी श्रीकांत आणि लक्ष सेन यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगेल.

आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच श्रीकांत कालाजाऊ विरुद्ध भिडल्याचे पाहायला मिळाले. श्रीकांतने पहिल्यापासून आक्रमक खेळ करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. पहिल्या सेटमध्ये श्रीकांतने 11-5 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर आणखी आक्रम खेळ दाखवत त्याने प्रतिस्पर्धी डॅनिश खेळाडूला हतबल करुन सोडले. दुसऱ्या सेटमध्ये ब्रेकपर्यंत श्रीकांतने 11-3 अशी आघाडी मिळवली होती. पहिल्या सेटपेक्षा मोठ्या फरकाने सामना जिंकत श्रीकांतने सेमी फायनलचे तिकीट पक्के केले.

किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारे अनुक्रमे चौथे आणि पाचवे भारतीय आहेत. यापूर्वी 1983 मध्ये प्रकाश पादुकोण यांनी पहिल्यांदा ही स्पर्धा गाजवली होती. त्यानंतर 2019 मध्ये बी साई प्रणीतने कांस्य पदक जिंकले होते. याच वर्षी महिला गटात पीव्ही सिंधूनं या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय आहे.

महिला गटात सिंधूचा प्रवास संपुष्टात

दुसरीकडे महिला एकेरीत पीव्ही सिंधूकडून जेतेपदाची आस होती. पण तिचा प्रवास क्वार्टर फायनलमध्येच संपुष्टात आला. शुक्रवारी कॅरोलिना मारिन स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात जागतिक नंबर वन ताई जू यिंग हिने सिंधूला पराभूत केले. 42 मिनिटांच्या लढतीत सिंधूला 17-21, 13-21 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. ताईविरुद्ध सिंधूचा हा सलग पाचवा पराभव ठरला.

तैवानच्या ताईनं या विजयासह सिंधू विरुद्धचे आपले रेकॉर्ड आणखी मजबूत केले आहे. या दोघींच्या लढतीत 15-5 असा फरक आहे. यापूर्वी सिंधू आणि ताई यांच्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सामना रंगला होता. सेमी फायनल लढतीत ताईनं सिंधूला पराभूत करत फायनल गाठली होती. हा सामना गमावल्यानंतर सिंधूनं कांस्य पदकाची कमाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT