Kinchit Shah Proposes to His Girlfriend at Dubai Stadium After India Clash esakal
क्रीडा

सामना हारला पण...हाँगकाँगच्या खेळाडूचं प्रेयसीला ‘फिल्मी स्टाईल’ प्रपोज

धनश्री ओतारी

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत काल भारताने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात हाँगकाँगचा पराभव झालेला असला तरी याच संघातील संघातील खेळाडूनं प्रेम जिंकल असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. हाँगकाँगच्या एका खेळाडूने सामना संपताच आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले.

हाँगकाँगच्या किंचित शाहने त्याच्या प्रेयसीला सामना संपल्यानंतर प्रपोज केलं. विशेष म्हणजे या प्रपोजनंतर त्याच्या प्रेयसीने त्याला होकारदेखील दिला. आजच्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव झाला.

सामना संपताच किंचित थेट स्टॅड्सकडे जाण्यासाठी वळला, त्यांची गर्लफ्रेंड सामना पाहण्यासाठी तिथे बसली होती. तिच्याजवळ पोहचताच गुडघ्यावर बसला आणि तिला फिल्मी स्टाईल प्रपोज केलं. हे दृश्य पाहून हाँगकाँगची संपूर्ण टीम उत्साहाने टाळ्या वाजवत होती.

दरम्यान आजच्या सामन्यातही किंचित शाहने संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. सलामीचे फलंदाज स्वास्तात बाद झाल्यानंतर त्याने तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीला येत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्याने २८ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक षठकार यांच्या मदतीने ३० धावा केल्या. पुढे हाँगकाँग संघाला २० षटकांत १५२ धावा करता आल्या. तर भारताचा ४० धावांनी विजय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mill Workers Protest : मीरा भाईंदर झाकी है! गिरणी कामगारांच्या आंदोलनासाठी सेना-मनसे आले एकत्र; बाळा नांदगावकर म्हणाले...

'खुर्ची'वरून राडा... एक पोस्ट, दोन अधिकारी... CMO कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

Latest Maharashtra News Live Updates: वि. के. वयम् मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

Viral Video: सर्पमित्र कोब्रा पकडत होता, तेवढ्याच सापाने केला दंश... जाग्यावरच कोसळला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार प्रिया बापट आणि उमेश कामत; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

SCROLL FOR NEXT