Suryakumar Yadav Sakal
क्रीडा

पुण्याच्या मैदानात SKY च्या एन्ट्रीसह MI पलटन ट्रॅकवर येणार?

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात खराब झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामातील ग्रुप स्टेजमधील सर्व लढती या महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईच्या मैदानात (Pune Mumbai Cricket Stadium) होत आहेत. मुंबईच्या ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातील सलग दोन पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सचा संघ पुण्याच्या मैदानात आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात पहिल्या विजय मिळवण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील. सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यातून यंदाच्या हंगामाला सुरुवात करण्याची अपेक्षा आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या लढतीतून सुर्यकुमार यादव मुंबई संघात परतणार आहे. त्याच्या येण्यामुळे संघाचा संघर्ष संपेल, अशी आशा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना असेल. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत सुर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यात तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग नव्हता. तो संघाचा हुकमी एक्का असून तो फिट असणे ही मुंबई इंडियन्सची जमेची बाजू ठरेल.

मुंबई पलटनच्या स्टार बॅटरने कोलकाता विरुद्धच्या सामन्याआधी आपल्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो फलंदाजीचा सराव करताना पाहायला मिळते. त्याचे हे फोटो तो कोलकाता विरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या टीमच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार हे पक्के असल्याचे संकेत मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT