KL Rahul Athiya Shetty Wedding 
क्रीडा

KL Rahul-Athiya Shetty: लग्नाआधीच KL राहुल अन् अथिया एकाच हॉटेलमध्ये...; Video आला समोर

हॉटेलच्या आतून एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये राहुल..

Kiran Mahanavar

KL Rahul Athiya Shetty Wedding : भारतीय क्रिकेटर लोकेश राहुल लवकरच अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. राहुल त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न करणाऱ्यांच्या यादीत सामील होणार आहे. लग्नाच्या आधी बुधवारी रात्री दोघेही जुहूमधील एका हॉटेलमध्ये एकत्र पोहोचले. दोघांचा हॉटेलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, आता हॉटेलच्या आतील व्हिडिओही समोर आला आहे.

भारतीय क्रिकेटपटू लोकेश राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून ब्रेक घेतला आहे. यादरम्यान तो आपली अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करणार आहे. या महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांच्या लग्नाची तयारी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात राहुलचा नक्कीच समावेश झाला आहे. राहुलचे लग्न 21 ते 23 जानेवारी दरम्यान मुंबईत होणार असून श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका 15 जानेवारीला संपणार आहे. नववर्षापूर्वी हे जोडपे जुहूच्या हॉटेलमध्ये पोहोचले आहे.

आधी राहुल आणि अथिया शेट्टी जुहूमधील एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसले. राहुलने ब्लू जीन्स आणि स्काय ब्लू शर्ट घातलेला होता, तर अथियानेही त्याच रंगाचा जीन्स टॉप घातला होता. राहुल आणि अथिया एकत्र हॉटेलमध्ये पोहोचले, मात्र दोघांनी वेगवेगळ्या वेळी हॉटेल सोडले. हॉटेलमधील एक व्हिडिओही समोर आला आहे.

हॉटेलच्या आतून एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये राहुल काहीतरी खाताना दिसत आहे आणि अथिया मेकअप करताना दिसत आहे. दोघेही शुटिंगसाठी जुहूच्या हॉटेलमध्ये पोहोचले होते. इथे दोघांमध्ये लग्न आणि त्याची तयारी याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle 2026 : कधी होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार? पडद्यामागे मोठ्या हालचाली, संभवित मंत्र्यांची यादीही समोर...

Salman Khan: ५२ वर्षांनंतर सलमान खान 'गॅलेक्सी' सोडणार! आता भाईजान समुद्रकिनारी नव्या ६ मजली बंगल्यात राहणार; का घेतला निर्णय?

WI vs SL 1st Test: आमिर जांगू-रोस्टन चेस यांनी क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलला... १४९ वर्षांत घडला नव्हता असा पराक्रम गाजवला

'गोविंदाचे अनेक अफेअर्स होते'; पत्नी सुनीताचा मोठा खुलासा, म्हणाली... 'सहन करावंच लागतं'

Karachi Attack: कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा निशाणा भारतावर; कोणताही पुरावा नसताना ठरवले जबाबदार

SCROLL FOR NEXT