KL Rahul esakal
क्रीडा

KL Rahul : खेळ राहुल, रबाडा अन् पावसाचा... केएलच्या 70 धावा येणार पंतच्या मुळावर?

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul South Africa Vs India 1st Test Day 1 : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला ढगाळ वातावरणात आणि पावसाच्या सावटाखाली आफ्रिकेच्या तोफखान्याचा सामना करावा लागला. भारताची टॉप ऑर्डर ढेपाळल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुलने झुंजार खेळी करत भारताला 200 धावांचा टप्पा गाठून दिला.

मात्र शेवटच्या सत्रात पावसाने खेळ केला अन् दिवसाचा खेळ थांबवावा लागला. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 8 बाद 208 धावा झाल्या होत्या केएल राहुल 70 धावा करून नाबाद होता.

केएल राहुलने आपल्या आक्रमक खेळीने भारताला ऋषभ पंतची उणीव भासू दिली नाही. विकेट किपर आणि मधल्या फळातील फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेत धडाकेबाज खेळी केली. या खेळीमुळे पंतचे धाबे नक्कीच दणाणले असतील.

आफ्रिकेकडून रबाडाने भेदक मारा करत भारताला निम्मा संघ गारद केला. आता उद्या भारतीय संघ आपला डाव पुढे नेईल.

पहिले सत्र :

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. मात्र सत्राच्या शेवटी भारतीय फलंदाजांनी डाव सावरत संघाला दिलासा दिला.

ढगाळ वातावरणात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजी केली. हिरव्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार रोहितला 5 धावांवर बाद केलं. त्यानंतर डावखुऱ्या बर्गरने यशस्वी जयस्वालला (17) आणि शुभमन गिलला (2) धावांवर बाद करत भारताची अवस्था 3 बाद 24 धावा अशी केली.

यानंतर आलेल्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत उपराहापर्यंत भारताला 91 धावा करून दिल्या. खेळ थांबला त्यावेळी विराट 33 आणि अय्यर 31 धावा करून नाबाद होते.

दुसरे सत्र :

दुसऱ्या सत्रात कगिसो रबाडा भारताची डोकेदुखी ठरला. त्याने विराट आणि श्रेयस अय्यरची जमलेली जोडी फोडली. त्याने अय्यरला 31 तर विराट कोहलीला 38 धावांवर बाद केलं. यानंतर केएल राहुलने रविचंद्रन अश्विन सोबत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रबाडाने अश्विनला 8 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला.

यानंतर मात्र शार्दुल ठाकूरने केएल राहुलला साथ देत 43 धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारताला 200 च्या पार पोहचवणार असे वाटत असतानाच रबाडाने शार्दुलला 24 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. चहापानापर्यंत भारताने सात बाद 176 धावा केल्या होत्या.

तिसरे सत्र :

केएल राहुलने पहिल्या दिवसाचे तिसरे सत्र सुरू होताच आपले अर्धशतक पूर्ण केले. 50 धावांमधील त्याने 40 धावा या चौकार आणि षटकारांनीच पूर्ण केल्या होत्या. त्याच्या झुंजार खेळीमुळे भारतीय संघ 200 च्या पार पोहचला. मात्र भारतीय संघाच्या 59 षटकात 8 बाद 208 धावा झाल्या असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा करण्यात आली.

 (Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT