KL Rahul Fitness Update
KL Rahul Fitness Update esakal
क्रीडा

KL Rahul Fitness Update : केएल राहुल आशिया कपसाठी ठोकला शड्डू ; जीममधील Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Fitness Update : भारतीय संघाच्या दृष्टीकोणातून गेल्या काही दिवसांपासून चांगल्या वार्ता कानावर येत आहेत. जसप्रीत बुमराह हा आपला फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. तर श्रेयस अय्यरने देखील नेटमध्ये फलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे.

आता भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि पार्ट टाईम विकेटकिपर केएल राहुलने देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आपण देखील फिटनेस पुन्हा मिळवण्यात यश मिळवलं असल्याचे दाखवून दिलं. त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत आशिया कपसाठी जणू शड्डूच ठोकला. (KL Rahul Fitness News)

केएल राहुलच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यावर त्याने शस्त्रक्रिया करून घेतली होती. यानंतर तो एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत होता. काही दिवसांपासून त्याने नेटमध्ये हलका सराव करण्यास देखील सुरूवात केली होती. आता त्याचा जीममध्ये पूर्ण क्षमतेने व्यायाम करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

केएल राहुल वर्ल्डकपचा विकेटकिपर

एनसीएमध्ये ऋषभ पंत देखील आपल्या दुखापतीतून सावरण्यासाठी घाम गाळत आहे. मात्र संघ व्यवस्थापन केएल राहुलकडे भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये संघाचा विकेटकिपर म्हणून पाहत आहे. केएल राहुल (KL Rahul) हा सलामीला तसेच मधल्या फळीत देखील फलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर त्याला विकेटकिपरचा देखील अनुभव आहे.

त्यामुळेच संजू सॅमसन आणि इशान किशन हे पूर्णवेळ विकेटकिपर असून देखील संघ व्यवस्थापन केएल राहुलचाच वर्ल्डकपसाठी विचार करण्याची जास्त शक्यता आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्या इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार 'ऋषभ पंत हा वर्ल्डकपसाठी फिट होण्याची शक्यता नाही. त्याला अजून वेळ हवा आहे. विशेष म्हणजे त्याला विकेटकिपिंग करण्यासाठी अजून बराच वेळ लागेल. केएल राहुल हा आमचा वर्ल्डकपसाठीचा विकेटकिपर असेल याचबरोबर संजू आणि इशान किशन देखील बॅकअप प्लॅन म्हणून असतीलच.' (ICC ODI World Cup 2023)

बीसीसीआय आणि एनसीए जरी केएल राहुल हा आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात परतेल असा विश्वास व्यक्त करत असले तरी राहुलने आता कुठे सराव सुरू केला आहे. तो अजून पूर्ण मॅच फिटनेस मिळवण्यापर्यंत पोहचलेला नाही. आशिया कप हा सप्टेंबरमध्ये होणार आहे. केएल राहुल त्यासाठी पूर्णपणे तंदुरूस्त होऊ शकतो. (Asia Cup 2023 )

बीसीसीआयचा वरिष्ठ अधिकारी पुढे म्हणाला की, 'आयर्लंड दौऱ्यावर राहुल, अय्यर आणि जसप्रीत यांचा विचार करावा अशी कल्पना आहे. याचा त्यांना मॅच प्रॅक्टिस होण्यासाठी फायदा व्हावा असा उद्येश आहे. मात्र श्रेयस आणि केएल राहुल तोपर्यंत फिट होतील की नाही हे माहिती नाही.'

'आमच्याकडे वेळ आहे. आम्ही त्यांची प्रगती कशी होते याकडे लक्ष ठेवून आहे. जर सर्व योग्य राहिलं तर ते आशिया कपपर्यंत फिट होतील. जसप्रीत बुमराह हा आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघात असेल अशी आशा आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT